किल्लारी (ता. औसा) — श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व शेतकरी मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भारत सरकारचे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री. गडकरी साहेबांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना ऊस उत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे आवाहन केले. तसेच कारखान्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यूजी पवार, आमदार रमेश आप्पा कराड, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाजी पटेल, शिवाजी पाटील कव्हेकर, सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांसह कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

