आश्विन वद्य द्वादशी दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी
हे सण साजरे केले जातात.वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; परंतु प्रत्यक्षात हा एक स्वतंत्र आणि पवित्र सण आहे.
या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता कामधेनू श्री विष्णूच्या लहरींचे वहन ब्रह्मांडभर करण्याचे कार्य करते, अशी मान्यता आहे. तिच्या कृतज्ञतेपोटी अंगणात तुळशीवृंदावनाशेजारी गाय उभी करून तिची पूजा केली जाते.
या दिवशी आपल्या गाईला वासवदत्तेचे रूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे "बारसे" होऊन तिला देवत्व प्राप्त होते — म्हणूनच या दिवसाला “वसुबारस” असे म्हणतात.
📜 इतिहास:
समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, त्यांपैकी नंदा नावाच्या धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
🙏 उद्देश:
या आणि पुढील जन्मांतील सर्व कामना पूर्ण व्हाव्यात, तसेच पूजित गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात वास मिळावा, अशी श्रद्धा आहे.
🌾 साजरा करण्याची पद्धत:
या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सवत्स गायीची सकाळी किंवा सायंकाळी पूजा करतात.
✨ सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!