उमरगा प्रतिनिधी : गावाकरभारी/सरपंच होण्याचे इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची गुड न्यूज आहे. तालुक्यात सरपंच पद आरक्षण सोडत कोणासाठी राहील याची अनेकांना उत्सुकता आहे. आरक्षण निश्चिती मुळे खऱ्या अर्थाने गावच्या राजकारणात राजकीय वातावरण ढवळायला सुरवात होत असते. पक्ष, गट, तिकीट पेनेल याची जुळवाजुळव करायला सुरवात होते. त्यांच्या साठी आनंदाची ब्रेकिंग गुड न्यूज म्हणता येईल.
उमरगा तालुक्यातील सुमारे 80 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची पंचवार्षिक मुदत लवकरच संपत असल्याने 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अंतू-बळी पतंगे सांस्कृतिक सभागृह येथे सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोडतीअंतर्गत आरक्षणाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे असणार आहे:
अनुसूचित जाती: 13
अनुसूचित जमाती: 2
इतर मागासवर्गीय: 21
सर्वसाधारण: 44
ही माहिती उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत जाहीर केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील संबंधित गावांमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दवंडी देऊन तसेच नोटीस बोर्डावर माहिती प्रसारित करण्याच्या सूचना 9 एप्रिल रोजी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसिलदार गोविंद येरमे यांच्या मार्फत देण्यात आली असून या सोडतीच्या वेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ही तहसिलदार येरमे यांनी केले आहे.