मराठा सेवा संघ पुणे शहरच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्य पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला

  मराठा सेवा संघ पुणे शहरच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक दिना निमित्त पुष्पहार अर्पण करताना  मराठा सेवा संघाचे केंद्रीय पदाधिकारी राजेंद्र कुंजीर,जिल्हा सरचिटणीस महेश घाडगे,महेश टेळे पाटील,देविदास लोणकर, सारिका जगताप, मल्लीनाथ गुर्वे

पुणे दि.१६ जाने- मराठा सेवा संघ पुणे शहरच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक दिना निमित्त देशमुख एस बी उर्फ भैय्यासाहेब, निवृत्त तांत्रिक संचालक म.रा.वि.म. महाराष्ट्र. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुण्याच्या डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना भैय्यासाहेब देशमुख म्हणाले ' छत्रपती संभाजी महाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा कारभार हाती घेतला परंतु एकाचवेळी ५ मोठ्या शत्रूं बरोबर लढून विजय मिळविणारे संभाजी राजे हे महापराक्रमी पुत्र होते.

प्रतिकूल परिस्थितीत परकीय आणि स्वकीयांशी लढत स्वराज्य टिकवण्याचे मोठे काम आणि धाडस त्यांनी केले असल्याचे सांगन त्यांचा इतिहास प्रत्येक घरात पोहचला गेला पाहिजे असे मत व्यक्त केले. 

यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय पदाधिकारी राजेंद्र कुंजीर, जिल्हा सरचिटणीस महेश घाडगे, महेश टेळे पाटील ,देविदास लोणकर, सारिका जगताप, मल्लीनाथ गुर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केले.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने