शाहू महाराज जयंती निमित्त सम्राट बुद्ध विहारात ज्ञानवर्धन स्पर्धा व सन्मान सोहळा

पुणे – सम्राट अशोक बुद्ध विहार येथे भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य ज्ञानवर्धन प्रश्न स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ट्रॉफी  प्रमाणपत्र व बुद्ध परिपाठ वदंना प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध रूप यांना अभिवादन व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर उपस्थित भारतीय बौध्द महासभा पदाधिकारी मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये आरक्षण धोरण, अंतर्गत विवाह प्रोत्साहन, शेतकरी धोरण, धरण निर्मिती, शैक्षणिक कार्य, महिला सबलीकरण, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परिषदेत दिलेला सन्मान यावर मान्यवरांनी आपली विचारमंथनपर मते व्यक्त केली.



या वेळी भारतीय बौध्द महासभेचे पुणे कार्यक्षेत्रातील अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहून त्यांनी समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करताना बौध्द समाज बांधवांना नियमितपणे बुद्ध विहारात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौध्द उपासक उपासिका महिला, पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब भारूड यांनी तर आभार प्रदर्शन राम आखाडे यांनी मानले.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने