मुरुम/वार्ताहर,
काश्मीर च्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुरूम शहर येथे निषेध सभा आयोजित करून भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला. या हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उवस्थित होते. शनिवारी सांयकाळी मुरूम शहरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या शोकसभेच्या प्रसंगी सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
श्रद्धांजली सभेच्या वेळी उपस्थित नागरिकांनी दिवंगत बांधवांच्या स्मृतीप्रित्यर्थ मेणबत्त्या प्रज्वलित केल्या व दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेण्याची आणि देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आल्याचे अनेकांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी प्रा.दत्ता इंगळे,शेखर मूदकणा,रशीद शेख,बाबा कुरेशी, रफिक पटेल,महेश मोठे,मोहन जाधव, भगत माळी,बंडू चव्हाण यांच्यासह सर्व जाती धर्मातील बांधव उपस्थित होते