पुणे दि. 23 प्रतिनिधी.
नांदेड सिटी, सिंहगड रोड पुणे येथे राहणारे आयु.अरुण मल्लीनाथ गायकवाड यांची खडकवासला वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आसुन त्यांच्या या निवडीचे स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.
नुकतीच त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आणि यानिमित्ताने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमावेळी खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र कांबळे, महा सचिव गौतम तायडे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष किशोर रिकीबे, प्रसिद्ध प्रमुख संदीप चौधरी, पर्वती मतदारसंघ अध्यक्ष अॅड. रवींद्र गायकवाड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अरुण गायकवाड यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल, आशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना केल्या.