उमरगा. प्रतिनिधी - बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना टाळाटाळ करू नका सन्मानाची वागणूक द्यावी व जलद गतीने पारदर्शक पद्धतीने कर्ज वाटप करावे अशा सूचना आमदार प्रवीण स्वामी यांनी येथील बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
उमरगा लोहारा तालुका खरीप हंगाम पूर्व तयारी तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज वाटप संदर्भात आमदार प्रवीण स्वामी यांच्या पुढाकाराने उमरगा तहसील कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा शिवसेनेचे नेते बाबा पाटील तहसीलदार गोविंद येरमे तालुका कृषी अधिकारी रितापुरे लोहारा गटविकास अधिकारी शितल खिंडे उमरगा गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, "बँकांनी दर्शनी भागावर संबंधित गावाची यादी डकवावी 31 जुलै 2025 पर्यंत जुन्या पात्र शेतकऱ्यांच् कर्ज पुनर्जीवित करून नव्याने कर्ज वाटप करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख कर्ज वाटप सवलतीचा लाभ मिळू शकतो.
वन टाइम सेटलमेंट शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळावे बँकांनी कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दराने खत बियाणे उपलब्ध करून द्यावे. कृषी विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई िनिर्माण करून चढ्या दराने विक्री करत असल्यास कृषी अधिकार्याने तातडीने संबंधितावर कारवाई करावी. असे निर्देश यावेळी देण्यात आले. ्््महाबीज कंपनी चे बियाणे तुटवडा व पुरेसा साठा यावरही चर्चा झाली यात नव्या वाणाचा पर्याय शेतकऱ्यांनी खुला ठेवावा असे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले कंपन्याने खात्रीशीर बियाणे उपलब्ध करून द्यावे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते शेतकरी आपलय अन्नसुरक्षेचा कणा आहे खरीप हंगाम यशस्वीतेसाठी बँक प्रशासन व कृषी विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी अशी सूचना यावेळी देण्यात आला तसेच या बैठकीस अधिकाऱ्याचा विलंब व अनुपस्थिती यावर लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अर्जुन बिराजदार बाजार समितीचे माजी सभापती रणधीर पवार प्रा डी के माने विजय तळबभोगे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश पवार आप्पाराव गायकवाड सतीश जाधव अण्णासाहेब पवार महेश शिंदे आधी बँकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते
