कोंढवा परिसरात वारंवार वीज खंडित होण्यामुळे नागरिक त्रस्त; MSEB विरोधात रस्ता रोकोचा इशारा

कोंढवा, पुणे – साई बाबा नगर, भाग्योदय नगर, कोढंवा नवाजिश पार्क, तसेच सर्वे नंबर ४२ आणि प्रभाग क्रमांक २७/४१ या भागांतील नागरिक आणि व्यावसायिक सध्या वारंवार वीज खंडित होण्यामुळे हैराण झाले आहेत.

महिन्याला लाखो रु. बिल भरून ही कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरी मुळे भागातील गृह निर्माण सहकारी सोसायटयांना लिप्ट साठी जनरेटर वापरावे लागत आहे. लाईट बिला व्यतिरिक्त डिझेल चा 10 ते 15 हजाराचा  आर्थिक भुरदंड सोसावा लागत आहे.

दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो असून, यामुळे दैनंदिन जीवनात आणि व्यवसायात अडथळे निर्माण होत आहेत. चौकशी केली असता खात्रीशीर माहिती दिली जात नाही. मोघम चुकीची माहिती दिली जाते. किंवा वारंवार संम्पर्क नंबर व्यस्त सांगितले जाते.

या समस्येचा मुख्य कारण MSEB (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) चा बेफिकीर कारभार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. 

या पार्श्वभूमीवर, सोमजी चौक येथील कोंढवा बिध्रुक MSEB कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

या निवेदनाची दखल न घेतल्यास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते छबील पटेल यांनी दिला आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने