कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर जबाबदारी आणि प्रशासनाची
हीअसणार कर्डी नजर.
सन २०२५-२६ या वर्षात दिनांक- ०७.०६.२०२५ रोजी बकरी ईद हा. सण
राज्यात साजरा होणार आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल/ कुर्वांनी
करण्यात येते. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९९५ सुघारणा दिनांक- ४ मार्च २०१५
पासून राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.
सदर सुधारित
अधिनियमाप्रमाणे गोवंशाची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच या अधिनियमातील कलम ५ अ
अन्वये गोवंशाची कत्तल, कत्तलीसाठी वाहतुक, कत्तलीसाठी निर्यात, कत्तलीसाठी
खरेदी-विक्री, कत्तलीकरिता विल्हेवाट, गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास व
राज्याबाहेर कत्तल केलेल्या गोवंझाचे मांस ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई आहे.
बकरी
ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्याबंदीबाबत राज्य गोसेवा आयोगाची कार्यवाही
बकरी ईद
सण ०७ जून २०२५ रोजी साजरा होणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य
गोसेवा आयोगाने गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.