भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांच्या छावण्या उध्वस्त केल्या आणि पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा पुरेपूर बदला घेतला.
सैनिकांच्या शौर्याला सलामी आणि प्रोत्साहन देण्या साठी मुरूम ता. उमरगा वाशियांच्या वतीने शहरात दि. 25 मे रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या रॅलीची सुरुवात शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथून झाली.त्यानंतर किसान चौक, हनुमान चौक ,अशोक चौक, महात्मा बसेश्वर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत उत्साहात रॅली संम्पन्न झाली.
यावेळी भारत माता की जय, अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे, वंदे मातरम, आशा घोषणा देत तिरंगा फडकावत नागरिक मोट्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिकांचा व सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबाचा सन्मान कार्यक्रम घेवून सन्मान करण्यात आला.आणि राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता करण्यात आली.
श्रीकांत मिनीयार, माजी सैनिक व्यंकट चौधरी, राजेंद्र बेंडकाळे, रूपचंद गायकवाड, देविदास व्हनाळे, शिवशरण वरनाळे, गुलाब डोंगरे,राहुल वाघ, भगत माळी,मनीष मुदकण्णा, अमृत वरनाळे, प्राध्यापक दत्तात्रय इंगळे, शरणाप्पा मुदकण्णा, आनंदनगर सरपंच अनिता जाधव, लखन बोंडवे, डॉ, खाजालाल ढोबळे,अरविंद फुगटे यांच्यासह शहरातील सर्वच माजी सैनिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.