जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पुण्यातील संतोष जगदाळे आणि कोंढवा कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारतर्फे आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे उपस्थित होते.
शहीद संतोष जगदाळे यांची कन्या आसावरीने कायदेविषयक डिप्लोमामध्ये यश मिळवले आहे. शासकीय सेवेत समावेशासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.