पुणे प्रतिनिधी- भारतीय बौध्द महासभा हडपसर विधानसभा कार्यक्षेत्राच्या कार्यकरणीत सेक्रेटरी म्हणून राम आखाडे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून अनंत सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बौध्द धम्म कार्यात अग्रसर असणारी ख्यातनाम भारतीय बौध्द महासभा यांचे धार्मिक कार्य, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पुण्यात साईनगर कोंढवा येथे पुणे कार्यकारणी ची विशेष बैठक पार पडली.
यावेळी झोन ऐवजी विधानसभा कार्यक्षेत्र निर्माण करून ज्यास्तीत ज्यास्त कार्यकर्त्यांना सामावून घेवून भारतीय बौध्द महासभेचे कार्य वस्ती-वस्ती प्रर्यंत पोहचवणेचे आणि शाखा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न आणि कार्य जोमाने पुढे नेहाण्याचा संकल्प केला. त्यानुसार विविध कार्यक्षेत्र पदाधिकारी निवड व जबाबदारी सोपवण्याचे काम विविध ठिकाणी बैठका घेवून करण्यात येत आसल्याची माहिती यावेळी जिल्हा कार्यकरींनी यावेळी दिली.
या चर्चा सत्र बैठकीत हडपसर विधानसभा कार्यक्षेत्राच्या कार्यकरणीत सेक्रेटरी म्हणून राम आखाडे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून अनंत सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नविन पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करून त्यांना नविन जबाबदारी सोपवण्यात आली.
यावेळी सिधार्थ नागदेवते, जगन्नाथ मेश्राम,एम एन गायकवाड,नानासाहेब भारूड,बसवन्त सोनकांबळे,राजरत्न थोरात,राम आखाडे,दिलीप कांबळे, अप्पा तळेकर,हरीश जावळे,गंगाराम नडगेरी,गणेश चव्हाण,अनंत सरोदे, एम वाय गुरवे,रमेश भारूड इत्यादी उपासक उवस्थित होते.