उमरगा :
उमरगा लोहारा चे आमदार प्रवीण स्वामी यांच्या 'शिवालय 'या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग जवळ, कोर्टा समोर या संपर्क कार्यालय चे उद्घाटन झाले.यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर कार्यालय चे बाबा पाटील यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन झाले.
यावेळी शिवसेना युवा नेते डॉक्टर अजिंक्य पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सुलतान सेठ, रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी पंचायत समिती सदस्य मारुती थोरे,अशोक सांगवे, भगवान जाधव, विजयकुमार नागणे, नानाराव भोसले,संतोष जाधव, विजयकुमार तळभोगे, शिवसेना तालुका युवा प्रमुख अजित चौधरी, भगवान जाधव, सदाशिव पाटील, आप्पाराव गायकवाड,तुकाराम गायकवाड, संतोष जाधव, दत्ता शिंदे, राजेंद्र समाणे, दत्ता सोंडे पाटील,प्रा डी के माने,सुधाकर पाटील, सतीश जाधव, महेश शिंदे, आदी शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.