मुरूम नगर परिषदसमोर बळीराजाचा समितीचे धरणे आंदोलन


मुरूम /वार्ताहर

मुरूम येथील बळीराजा मराठवाडा शेतकरी समितीचे सचिव उमाकांत मंगरुळे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी  दि.११ वार शुक्रवार पासून मुरूम नगर परिषद समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे  

   प्रमुख मागण्या 

1)  मुरूम शहराला दररोज शुध्द पाणी पुरवठा करावा.

१) तुंबलेल्या गटारी नाल्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करावी.

3) नळ कनेक्शन साठी उखडलेले रस्ते वर्षानुवर्ष त्याच अवस्थेत आहेत, ते तात्काळ बुजविणे

4) रस्त्यावरीत्म गतिरोधकांची उंची ही क्षमतेपेक्षा जास्त असल्यान दोन व चार चाकी वाहनांना इजा होऊन अपघाताचे प्रमाण वाढले. त्यामुळे अनावश्यक गतिरोधके कमी करून ती सुलभ करावीत.

प्रभाग नगर रचनेनुसार शहरातंर्गत भुयारी नाल्याची निर्मिती करून शौचालयाकरिता ड्रेनेज लाईन व्यवस्था करारी.

6) तत्कालीन मुख्याधिकारी श्रीम. विना पवार यांनी आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वरिष्ठ कार्यालयाकडे न. १ च्या उपलब्ध अभिलेखे सबंधी जो अहवाल पाठविला त्या अहवालाची प्रत संघटनेला सादर करावी,

7) खाजगी शाळा, महाविद्यालये किंवा इतर संस्थेमधील कर्मचारी है सन 2005 पासून न.प. मध्ये विविध पदावर लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तीना वेळोवेळी देय केलेल्या अग्रीम रक्कमेची माहिती, मानधन व इतर लागू असलेल्या भत्त्याची माहिती व्यक्तिनिहाय त्यांच्या पदनामासह उपलब्ध करून मिळावी.

8) स्वच्छ भारत अभियान योजनेतंर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या भ्रष्टाचाराबाबत तत्कालीन नगर सेवक अजित चौधरी  यांनी केलेल्या तक्रारीची संपूर्ण फाईल संघटनेला सादर करावी.

१) अशोक चौकातील लक्ष्मी मार्केट मधील गाळे धारकांची नामे मो. नंबर, करार पत्रके, गाळा वाटपाबाबतीतली नियमावली तसेच वर्षनिहाय मिळणारे उत्पन्न आणि वेळोवेळी केलेण्या खर्चाचा तपशील, इ. सविस्तर माहिती द्यावी.

10) चहा टपरी, पान टपरी भेळ वडापाव हातगाडे, फुलारी, मोची व इतर लघु उद्योजकांकडून देनेदिन जमा झालेला निधी व बँकेत भरणा केलेल्या चलनाच्या पावत्या का पासबुकावरील एंट्री यासह सविस्तर माहिती दयावी.

(11) आठवडी बाजारामधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती. वरील प्रमाणे स्वतंत्र धावी

या मागण्या घेऊन बळीराजाने मराठवाडा शेतकरी समिती अध्यक्ष आत्माराम वाघ, सचिव उमाकांत मंगरुळे, सदस्य रजनीकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कारभारा विरुद्ध एल्गार पुकारला आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने