वक्फ बोर्ड बिल विरोधात मुरूम शहरात मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन



मुरूम/प्रतिनिधी
केंद्र सरकारने पारित केलेले वक्फ विधेयक 2024 मुस्लिम समाजाच्या हित वोरोधी असून ते रद्द करण्याच्या मागणीसाठी मुरूम शहरात मुस्लिम समाजाकडून शुक्रवार दिनांक 11 रोजी धरणे आंदोलन करून समाजाच्या वतीने विधेयक मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनात अनेक वक्त्यांनी वक्फ कायदा विधेयक बोलताना, केंद्र सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात आसल्याचे सांगत या विधेयकात  संविधानाच्या कलम 21, 25 व 30 या तरतुदीचा सरासरी उल्लंघन करण्यात आलेला असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वतंत्र्य या मूलभूत अधिकारावर गदा आणला गेला आहे असा आरोप केला गेला.

देशात जवळजवळ नऊ लक्ष एकर जमीन व इतर स्तरावर जंगम मालमत्ता ही मुस्लिम धर्मातील लोकांनी आपली खाजगी जमीन व संपत्ती समाजासाठी दान केलेली आहे. ही संपत्ती कोणत्या ही शासनाच्या मालकीची नाही. शिवाय वक्फची जमीन व मालमत्तेचे व्यवस्थापन होणारे तंटे व त्याची निवारण याबाबत देशात 1995 मध्ये एक परिपूर्ण व मजबूत असा वक्फ कायदा संस्थेने पास केला होता. त्याला देशातील सर्व मुस्लिम समाजाची अनुमती सुद्धा होती. आणि त्यातून व्यवस्थितरित्या कार्य पार पाडले जात असताना सरकारने अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या बाबतीत द्वेष भावनेतून वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा ठेवून ते हडपण्याच्या उद्देशाने विधेयक मंजूर केलेले आहे. त्यामुळे तात्काळ विधेयक रद्द करावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

  • आंदोलनात संविधान जिंदाबाद, 
  • संविधान बचाव देश बचाव, 
  • काळा कायदा रद्द करा, अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.
  • परिसरातील अनेक मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते
  • आंदोलन सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत सुरु होते.
  • आंदोलनानंतर मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत केंद्र सरकार पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.
  • आंदोलन दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
या आंदोलनात मौलाना शौकत, मौलाना अब्बास, हाफिज अब्दुल, हाफिज सलीम, हाफीज निजाम बाबा कुरेशी, इकबाल चौधरी, सरफराज काजी, इलियास पीरजादे, सलीम अत्तार , अय्युब मासुलदार, राजू मुल्ला, अय्युब जवळगे, रफिक येणेगुरे, अय्युब इनामदार, युसुफ मुल्ला, अब्बास मुल्ला, जमीर इनामदार, शाहिद येणेगुरे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते 

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items