मुरूम प्रतिनिधी - उमरगा तालुक्यातील मुरूम शहरातील शासकीय रुग्णालयात किडणीविकार रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध असून रुग्णांच्या सेवेसाठी डायलीसीस सेंटर सुरू करण्यात आले आसुन त्याचे उमरगाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवारी जागतिक आरोग्यदिनी लोकार्पण करण्यात आले यावेळी मुरूम शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व महाडायलीसिस यांच्यावतीने हे डायलीसिस सेंटर कार्यान्वित झाल्याने शहर परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे. त्यामुळे या भागातील किडणी विकार रुग्णांना येथील रुग्णालयात समाधानकारक सेवा देण्यात येईल असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक एम एम अरदाळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना सांगितले.
या डायलीसिस सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उद्योग आघाडी प्रमुख श्रीकांत मिनियार, शिवसेनेचे बळीराम सुरवसे, उबठा गटाचे बसवराज वरनाळे, युवासेना तालुका प्रमुख अजित चौधरी,माजी नगरसेवक चंद्रशेखर मूदकणा, शरणप्पा मुदकणा,काँग्रेसचे राहुल वाघ,उबाठा गटाचे ,शहर अध्यक्ष जगदीश निंबरगे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख भगत माळी,शिवसेना शहर प्रमुख सुरेश मंगरूळे, राजाभाऊ शिंदे, भाजपाचे सिद्धलिंग हिरेमठ यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तविक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक एम एम अरदाले तर सूत्रसंचलन समुउपदेशक विजय भोसले यांनी केले.
दरम्यान डायलेसिस सेंटर मध्ये अद्यावत सर्व उपकरणे कार्यान्वीत करण्यात आले असून या सेंटरमध्ये एक तज्ञ डॉक्टर,दोन टेक्निक एक परिचारिका, एक सेवकाची नियुक्ती आहे.
दरम्यान डॉ एम एम अर्दाळे वैद्यकीय अधीक्षक, डॉ एस ए डुकरे वैद्यकीय अधिकारी, रवी भालेराव सहाय्यक अधीक्षक,सचिन तेगाडे, विजयकुमार भोसले प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी, सुजित जाधव समुपदेशक,संतोष थोरात समुपदेशक, रत्नदीप घोसले, आकाश चव्हाण, प्रमोद चव्हाण, रवी लोहार प्रयोगशाळा सहाय्यक, शीतल सुरवसे, शिल्पा हिरवे, राजश्री जाधव, रजिया टाकले, पूजा जाधव, सुजाता मठपती, गोरे पुष्पा, लखन भोसले, शिव दुर्गे,सचिन नागटिळक सुभाष राठोड संदीप बाबलसुरे तानाजी घाटे शेख बडेसाहेब .


