महिलांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात प्रचार व प्रसार मल्टीमिडीयाच्या माध्यमातून करावे - स्वाती शेंडे

मुरूम प्रतिनिधी - माविम च्या मार्गदर्शनाखाली बचत गटाच्या माद्यमातून महिलांची आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात होत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी गृह व लघु उद्योगाची निर्मिती केली आहे. बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात प्रचार व प्रसार मल्टीमिडीयाच्या माध्यमातून केल्यास उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री करून करून आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास करावा असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी व्यक्त केले.

 स्वाती शेंडे या धाराशिव येथे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, [माविम] धाराशिव कार्यालयामार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प, माविम वर्धापन दिनाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाचे जिल्हास्तरीय भव्य विक्री व प्रदर्शन नवतेजस्विनी महोत्सव २०२५ या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

      या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) धाराशिव या होत्या. यावेळी प्रमुख पाहुने संजय गुरव सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता तसेच विवेक खडसे जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय धाराशिव हे उपस्थित होते.

           हे प्रदर्शन दि.१७ मार्च ते १९ मार्च २०२५   या कालावधीत दि उस्मानाबाद क्लब सांस्कृतिक सभागृह, धाराशिव येथे आयोजित करण्तात आले होते. 

      या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रस्ताविक शोभा कुलकर्णी यांनी केले त्यांनी यावेळी या प्रदर्शनाचा उद्देश व कार्यक्रमाची रुपरेषा याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. यानंतर संजय गुरव यांनी व्यवसाय करत असताना ग्राहकाची गरज, आवडी निवडी यानुसार उत्पादन करावे तसेच स्थानिक ब्रँड तयार करुन त्याची जाहिरात करुन मार्केटींग मिळवावी व व्यवसाय करताना जिद्द व चिकाटी उद्योजकाच्या अंगी असावी याविषयी मार्गदर्शन केले.

       या नंतर विवेक खडसे यांनी माविम च्या मार्गदर्शना मुळे महिलांमध्ये निर्माण झालेल्या  नेतृत्व विकासामुळे, महिला सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सारख्या विविध ठिकाणचे महिलांचे नेतृत्व, महिलांचा कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीतील सहभाग, महिलांच्या आर्थिक व सामाजिक क्षेञातील प्रगतीतील माविमचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले.

      यावेळी उत्पादक महिला अनिता स्वामी एकुरगा ता. उमरगा यांनी मनोगत व्यक्त करताना माविमच्या मार्गदर्शनातून व सहकार्याने मला प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून भाकरी व्यवसायासाठी कर्ज मिळाले व मी बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरीचा व्यवसाय सुरु केला माझा व्यवसाय खूप चांगला सुरु आहे.यामुळे माला आर्थिक नफा झाला आहे व मी खूप समाधानी आहे असे मत व्यक्त केले. तर चैत्राली गुरव आलुर यांनी सांगितले की मी माविमच्या बचत गटात आले व  आय सी आय सी आय बँकेचे कर्ज घेऊन गुलाबाची फुले व झाडांच्या रोपांची रोपवाटिका सुरु केले यातून मला चांगले नफा झाला त्यामुळे मुलांच्या शिक्षणास चांगली आर्थिक मदत झाली. यानंतर मनिषा लिमकर कळंब, गोकर्ण पळसे एकुरगा, साधना चव्हाण ढोकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी महिला बचत गटातील स्टाॕलधारक महिला, जिल्ह्यातील माता सावित्री लोकसंचलित साधन केंद्र, धाराशिव, ज्ञानदिप लोकसंचलित साधन केंद्र,उमरगा, नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र, कळंब, समता लोकसंचलित साधन केंद्र, परांडा, नवस्त्री निर्माण लोकसंचलित साधन केंद्र, ढोकी व संज्योत लोकसंचलित साधन केंद्र,दाळींब या कार्यालयातील कर्मचारी यांना प्रशस्तीपञ व स्मृती चिन्ह देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

       या समारोप कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ.स्वप्नाली झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर टोंपे व्यवस्थापक, ज्ञानदिप लोकसंचलित साधन केंद्र, उमरगा यांनी केले. यावेळी माविम द्वारा स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू , उत्पादने व खाद्य पदार्थांचे स्टाॕल उभारण्यात आले होते. शरहातील व जिल्हाभरातील नागरीकांनी या प्रदर्शनास भरभरुन प्रतिसाद दिला. नवतेजस्विनी महोत्सव २०२५ यशस्वी करण्यासाठी सर्व लोकसंचलित साधन केंद्र व्यवस्थापक, लेखापाल, उपजीविका सल्लागार, सहयोगिनी, समुदाय साधनव्यक्ती, संचालक मंडळ, हुसैन्नी लेखाधिकारी, माविम धाराशिव, श्रीनाथ संधा MIS सल्लागार , माविम धाराशिव व राजाभाऊ शिंदे माविम धाराशिव यांनी मोलाचे योगदान दिले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items