मुरूम/वार्ताहर
उमरगा तालुक्यातील मुरूम येथे रामनवमी निमित्त रविवारी (दि6 एप्रिल) सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तसेच सांयकाळी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्त सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम कार्य पार पडले प्रभातकाळी श्री प्रभू राम मूर्तीची महापूजन करण्यात आले तर सकाळी 10 ते 12 पर्यंत किर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर 12 वाजता असंख्य महिला वयोवृद्ध नागरिकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्म उत्सव पाळणा कार्यक्रम साजरा करण्यात आले.
यावेळी मुरूमचे पोलिस अधिकारी संदीप दहिफळे,माजी नगराध्यक्ष व्यंकट जाधव,डॉ.नितीन डागा, श्रीराम कुलकर्णी, गोविंद कौलकर, रवी आंबूसे, उत्सव समितीचे अध्यक्ष सागर पोतदार, प्रमोद कुलकर्णी, निलेश महामुनी, सागर विभूते, महादेव महामुनी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सांयकाळी 5 वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली यामध्ये युवक बालचिमुकले मोठया संख्येने सहभागी होते. उत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सागर पोतदार, उपाध्यक्ष ओंकार पाटील , युवासेनेचे भगत माळी ,गौरी बोन्गरगे, अभिजित कुलकर्णी ,ईश्वर कडगांचे , प्रताप गिरीबा ,ओंकार कुंभार, सचिन नागोबा आदींनी विशेष परिश्रम घेतले .