उमरगा प्रतिनिधी- आगामी काळात महिनाभरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी अधिग्रहणासाठीचे प्रस्तावास तीन दिवसात मंजुरी द्यावी व टंचाईग्रस्त गावात तात्काळ टँकर सुरू करावे अशा सूचना आमदार प्रवीण स्वामी यांनी 8 एप्रिल रोजी मंगळवारी पाणीटंचाईच्या बैठ कीत दिले.
उमरगा तालुक्यातील पाणीटंचाई बाबत पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार प्रवीण स्वामी उपविभागीय अधिकारी गणेश पवार तहसीलदार गोविंद येरमे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर. पाणीपुरवठा उप अभियंता भुसारे नगरपालिका उप अभियंता पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोराळ नारंगवाडी नाई चाकूर कदेर आनंद नगर समुद्राळ. आधी गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे गावातील बोअर वेळेवर दुरुस्त केले जात नाहीत गावातील पाणीपुरवठा व लाईटची वेळ त्याचा टाळमेळ नसल्यामुळे अनेक गावात पाणी असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो अधिग्रहणाच्या प्रस्तावासाठी मंजुरी देताना विलंब लागतो तसेच अधिग्रहणाची रक्कम मिळतच नसल्याने नवीन अधिग्रहण देण्यासाठी ग्रामस्थांची असमर्थता दिसून येत आहे अशा तक्रारी ग्रामस्थांनी यावेळी केल्या. यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की अधिग्रणाचे प्रस्ताव टपाली न देता ग्रामसेवकांनी हातोहात प्रस्ताव मंजूर करून घ्यावा त्यामुळे विलंब होणार नाही चौकशीसाठी मंडळ अधिकाऱ्यांनीही हलगर्जी करता कामा नये तहसील विभागात दररोज एक तास पाणीटंचाईसाठी राखून ठेवावा पाणीपुरठा वा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गावात आल्यानंतर नोंदवही ठेवावी काम गुत्तेदार करीत असले तरी काम करून घेण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे पदाधिकारी पेक्षा ग्रामसेवक पाणीटंचाईसाठी सतर्क राहणे गरजेचे आहे अनेक गावात सब स्टेशनची मागणी असली तरी यासाठी जिल्हा नियोजन मंडळ व आमदार निधीतून योग्य ते प्रयत्न केले जातील.
नदी रुंदीकरण नाला सरळीकरण ओढा व नाले नदी यातील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा झाली असून त्यासाठी नाम फाउंडेशनंने स्थळ पहाणी अहवाल केल्यानंतर तात्काळ जेसीबी पोकलेन डिझेल उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी दोन दिवसात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा पोखरा अंतर्गत२१ गावाची कार्यशाळा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोळा खेड्याची योजनेबाबत लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचा कसोशीनेप्रयत्न केला जाईल. पाणीटंचाई प्रस्तावा बाबत ग्रामसेवक तलाठी यांनी हलगर्जी करता कामा नये अशा कडक सूचना उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी यावेळी दिला.
या बैठकीस बसवराज वरनाळे रज्जाक अत्तार भगवान जाधव महेश शिंदे सुधाकर पाटील विजय तळभोगे सतीश जाधव प्रा डी के माने विजय कुमार नागणे विस्तार अधिकारी एन एस राठोड एस एस राऊत के बी भांगे आधी सरपंच ग्रामसेवक तलाठी उपस्थित होते या बैठकीस गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी दांडी मारली.
उमरगा शहरात पंधरा दिवसातून एकदा तोही गढूळ पाणीपुरवठा होतो ही गंभीर बाब असून पावसाळ्यापूर्वी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सादर करावे तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी चे खोदकाम जेसीबी द्वारे न करता कटर मशीन ने करण्यात यावे अशा सूचनाही आमदार स्वामी यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाला दिला