केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड होणे आणि इतर घटना म्हणजे गृहमंत्रालय राज्यात आराजक्ता येण्याची वाट पाहतेय काय :आप मुकुंद किर्दत्त


पुणे दि. 2 - मुक्ताईनगर जळगावात पर्सनल गार्ड स्टाफ सोबत असताना सुद्धा एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड काढली जाते आणि त्यानंतर दोन दिवस या घटनेची नोंद सुद्धा पोलीस घेत नाहीत, स्वतः मंत्रिमहोदय रक्षा खडसे यांना पोलीस चौकीत जावे लागते. हे दुर्दैव असून पुण्यात स्वारगेट बस आगार वर्दीळीच्या ठिकाणी झालेला बलात्कार, हडपसर आमदाराच्या नातेवाईक चे अपहरण करून झालेला खून, सरपंच संतोष देशमुख चा अमानवीय करण्यात आलेला खून अशा खूनाच्या घटना, ही महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था स्थिती आहे!! 

असे असुन ही फडणवीस यांची गृहखाते सांभाळण्याची अजून हौस संपत नाही. अशी टीका करीत सत्तेतील सहभागीच सुरक्षित नसतील तर विरोधी आणि सर्वसामान्यांचं काय असा आरोप आप च्या मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर असतील किंवा सभापती निलम गोऱ्हे असतील, या सदरच्या घटनेवर ' आम्ही पोलिसांशी बोललो आम्ही अधिकाधिक कडक शिक्षा होईल याची काळजी घेऊ ' अशा पद्धतीचे ठराविक विधाने करतात. परंतु याबाबत प्रोऍक्टिव्ह म्हणजे स्वतःहून अशा घटना घडणार नाहीत या संदर्भात काहीही करताना दिसत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याशिवाय एक युतीमधील नेत्या रूपाली ठोंबरे या आरोपीच्या बाजूनेच स्वारगेट प्रकरणांमध्ये बाजू मांडताना दिसतात.

त्यामुळे महिला सुरक्षा महिला आत्मसन्मान यापेक्षा पक्षीय राजकारण करण्यामध्येच युतीच्या सर्व नेत्यांना अधिक रस दिसतो आहे. 

- मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items