स्था.स्व.संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच यश मिळवून देणार - आमदार प्रविण स्वामी यांची ग्वाही

उमरगा / प्रतिनिधी -

कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि एकजुटीच्या परफॉमन्स मुळे उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश घावघवीत यश मिळाले. त्याच ताकतीने आगामी काळात  ही शिवसेनेला (उबाठा) उज्वल भवितव्य मीळेल.असा विश्वास व्यक्त करून येणाऱ्या  स्थानिक स्वराज्य संस्था च्या नगर परिषद, जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळवून देणार अशी ग्वाही आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले             

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा उमरगा तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक रविवारी दि. 9 मार्च रोजी शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून धाराशव जिल्हा शिवसेना संपर्क सुनील काटमारे यासह आमदार प्रवीण स्वामी यांची उपस्थिती होती.

त्याचबरोबर यावेळी जिल्हा शिवसेना उपप्रमुख बसवराज वरनाळे, माजी जिल्हा परिषद दीपक जवळगे, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, तालुका युवासेना प्रमुख अजित चौधरी, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, भगवान जाधव, राजेंद्र सूर्यवंशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.         

यावेळी मार्गदर्शन करताना काटमारे म्हणाले की, "आमदार प्रवीण स्वामी हे विधानसभेत अभ्यासपूर्ण मत माडतात. एका गरीब व  तरुणास लोकांनी निवडून दिले हे कौतुकास्पद आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळाले मात्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे शिवसेना चा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण स्वामी पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्ष हा निखारा आहे हे शिवबंधन बांधताना मला दिसून आले विरोधकाची बलाढ्य ताकत असताना सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीस लोकांनी निवडून दिले त्याचे गमक म्हणजे कार्यकर्त्याची भक्कम पळी व एकजूट यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे हे जनतेचे ऋण फिरण्यासाठी मी आगामी काळात प्रमाणिकपणे पाच वर्ष तालुक्याच्या विकासासाठी काम करत  शिवसेना पक्ष संघटना मजबूत करून शिवसेनेला उज्वल भवितव्य मिळवून देण्यासाठी धनशक्ती विरोधात माणुसकीला लोकांनी महत्त्व दिले.पाच वर्षात सर्वाधिक निधी मिळवून जनतेचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

अध्यक्ष समारोपात बाबा पाटील म्हणाले की, "केवळ ईव्हीएम मशीन मुळे  हे सरकार सत्तेवर आलेले आहे. असे असले तरी या तालुक्यात महाविकास आघाडीची एकजूट भक्कम आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषता जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच उमरगा व मुरूम नगरपालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.            यावेळी उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख भगवान जाधव रणधीर पवार, सिद्धाराम हत्तरगे, उबाठा गटाचे मुरूम शहर अध्यक्ष  जगदीश निंबर्गे, अशोक सांगवे, महावीर कोराळे किरण कुकडे, महेश शिंदे, मारुती थोरे, विजय तळबोगे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रा डी के माने, सुधाकर पाटील, धीरज बेलमकर दत्ता शिंदे, आप्पाराव गायकवाड,  आधी शिवसेनेचे शाखाप्रमुख विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी नारंगवाडी तंटामुक्त अध्यक्ष आकाश पवार यांनी शिवसेना उबाटा गटात यावेळी प्रवेश केला

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items