उमरगा MIDC संदर्भात मंत्रालयात उदयोगमंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली.

उमरगा प्रतिनिधी - आज दि.19 रोजी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा लोहारा तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC )संदर्भात बैठक पार पडली.उमरगा MIDC (पश्चिम बाजूस) ते जकेकुर या जोड रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चेनंतर आवश्यक तितका निधी मंत्री सामंत यांनी उपलब्ध करून देण्यासंबंधी सूचना दिल्या.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC साठी जमा असलेला टॅक्स हा MIDC मध्येच विकास कामासाठी वापरण्यात यावा अशी सूचना ही यावेळी मंत्र्यांनी केली.टायर सारख्या प्रदुषणपूरक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजना लवकरात लवकर करण्यात याव्यात. MIDC क्षेत्रात बांधकामाची अट 40% ऐवजी 20% पूर्ववत करण्यात यावर ही अट 25% करण्याची अट करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उमरगा MIDC साठी रस्तेदुरुस्ती,वीज,पाणी यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन योग्य निधी देण्याचे मान्य करण्यात आले.

यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी,धाराशिव - कळंब तालुक्याचे आमदार कैलास पाटील,यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने