पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर ससून हॉस्पिटल मधील आरोग्यमित्र कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन झाले



पुणे दी. 18 प्रतिनिधी -

एकत्रित आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) अंतर्गत सहाय्य संस्था (TPA) अंतर्गत कार्य करणारे"आरोग्यमित्र" यांनी महाराष्ट्र राज्य शासन स्तरावरील वेतन वाढ" व इतर मागण्या मान्य संदर्भात पुण्यातजिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून घोषणा बाजी करत शासनाचे लक्ष वेधले.

सन 2012 पासून प्रामाणिकपणे शासनाच्या आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आरोग्यमित्र पदावर नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.

आरोग्यमित्र हा रुग्ण नोंदणी, रुग्णाचे समुपदेशन, लाभावी पात्रता निकय पहताळणी करणे, वैद्यकिय अधिकान्यांशी सल्लामसलत, रुग्णाला योजनेअंतर्गत कॅशलेस औषधी, क्लिनीकल चाचण्या, शस्त्रक्रिया व नंतर पाठपुरावा, प्रचार व जनजागृती शिबीरे आयोजीत करणे, दैनंदिन माहिती अपडेट करणे, पर्यवेक्षक, जिल्हाप्रमुख व क्षेत्र व्यवस्थापकांना अहवाल देणे इ. कामे करत आहेत. 

तसेच शासनाने सन 2018 पासुन "आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना" राज्य आरोग्य हमी सोसायटीकडुन हमी तत्वावर महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये सरकारी व खाजगी रुग्णालयात राबवण्यात येत आहेत. 

त्यानंतर दोन्ही योजना ह्या "एकत्रित आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना" ह्या नावाने आज शासन स्तरावरील आरोग्य क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. 

महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) अंतर्गत अंमलबजावणी सहाय्यक संस्था म्हणून कार्यरत असून सदर TPA अंतर्गत आम्ही दुदैवी आरोग्यमित्रांची नेमणूक झालेली असून आम्ही सन 2012 प्रामाणीकपणे रुग्णसेवा करत असुन सुरवातीस आम्हास 6,500/- व आता 11465/- इतक्या तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहोत. आम्ही उच्च पदविधर व संगणकाचे ज्ञान असलेले चांगले संवाद कौशल्य असलेले तरुण तरुणी आहोत. 

आम्ही वेळोवेळी शासन स्तरावर आमच्या रास्त मागण्या सादर केलेल्या आहेत पण कुठलीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. तसेच दिनांक :- 23/08/2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी जिवनदायी भवन, वरळी, मुंबई येथे सर्व महाराष्ट्र राज्यातील आरोग्यमित्रांनी एक दिवसीय निदर्शने आंदोलन केले होते त्यात आरोग्यमित्रांच्या वेतनवाढ संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहाय्य संस्था (TPA) यांना सुचना दिल्या असतांना देखील आजपर्यंत वेतनवाढ झालेली नाही.

 महाराष्ट्रातील सर्व आरोग्यमित्र 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 7 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली.परंतु अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने