मुरूम प्रतिनिधी-
येथील भीमनगर च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात अली.
यावेळी भव्य मिरवणूक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने शुक्रवारी साजरा करण्यात आले होते. सांयकाळी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन येथील पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर भीमनगर पासून अण्णा भाऊ साठे चौक, महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मिरवणूकीत आकर्षक विद्युत रोषणाई च्या रथात माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक प्रतिमा सजवण्यात आले होते. मिरणुकीत पारंपरिक वाद्य, हलगी ताशा व लेझीमच्या तालावर आणि विविध गाण्यावर चिमुकल्यासह युवकांनी नृत्य सादरीकरण केले. या मिरवणुकीत महिला वर्ग मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
जयंती मिरवणूक यशस्वीतेसाठी प्रा. अण्णाराव कांबळे, झुंबर बनसोडे, सूरज कांबळे, राम सागर, प्रणित गायकवाड, पोपट गायकवाड, सिद्धांत सोनवणे, प्रजित कांबळे, आनंद कांबळे, प्रदीप गायकवाड, रेवन गायकवाड, अभिषेक कांबळे, सूरज गायकवाड, अजिंक्य कांबळे, दयानंद गायकवाड, वैभव गायकवाड, सुंदर गायकवाड, तुषार कांबळे, संतोष कांबळे, महेंद्र कांबळे, विठ्ठल कांबळे, अभिजित गायकवाड, राष्ट्रजीत कांबळे आदींनी पुढाकार घेतला.