मुरूम येथील श्रीराम देवस्थानची सरकारच्या ताब्यात असलेली इनामी जमीन खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा घाट.-

मुरूम येथील श्रीराम देवस्थानची सरकारच्या ताब्यात असलेली इनामी जमीन खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा घाट.-

तत्कालीन विभागीय आयुक्त व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ 

उमरगा उपविभागीय अधिकाऱ्याने दिले आदेश

मुरूम / प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्रीराम देवस्थानची व सध्या सरकारच्या ताब्यात असलेली  इनामी जमीन एका खाजगी व्यक्तीच्या नावे विरासत करण्याचा आदेश उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे मुरूम मधील श्रीराम भक्तात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून हा आदेश रद्द करावा यासाठी आंदोलनाची तयारी करत आहेत. दरम्यान श्रीराम देवस्थानची इनामी जमीन  शासकीय निगराणीत घेवून सालाप्रमाणे लागण करण्याचे आदेश संभाजी नगरचे  तत्कालीन विभागीय आयुक्त तसेच धाराशिवचे  तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेली आहेत. असे असताना आता उमरगाचे विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्याने नव्याने आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की मुरूम शहरातील श्रीराम देवस्थानची  मुरूम शिवारातील  सर्व्हे नं 95 मधील 7 हे. 40 आर  इतकी इनामी जमीन व मौजे तुगाव शिवारातील स.न.7/2 मधील 4 हेक्टर 76 आर इनामी जमीन हि देवस्थानच्या नावे होती.

मात्र तत्कालीन  पुजारी नारायण काळे याने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संगनमत करून अनधिकृतपणे स्वतःच्या नावे करून घेतली होती.व यातील तुगाव शिवारातील सर्वच 4 हेक्टर 76 आर इनामी जमीन एका खाजगी व्यक्तीला अनधिकृतपणे विक्री केली आहे. तसेच मौजे मुरूम शिवारातील 7 हे.40 आर मधील तीन एकर जमीन एकास  अनधिकृतरित्या विक्री केली आहे.

मंदिराच्या नावे असलेली इनामी जमीन  नारायण काळे याने विक्री केल्यामुळे जमीन परत मंदिराच्या नावे करावेत  यासाठी तक्रारकर्त्यांनी धाराशिवचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून प्रकरण चालवले. तेंव्हा 2011 मध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी फुलारी यांनी श्रीराम देवस्थानची जमीन इनामी असुन ती शासकीय ताब्यात घ्यावेत व एक साल लागण करावे तसेच इनामी जमिनीची अनधिकृतपणे फेरफार केलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध  चौकशी करण्याचा निकाल दिला.

त्यानंतर या निकालाच्या विरोधात नारायण काळे याने विभागीय आयुक्तांकडे अपील केलेला होता. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी देखील 2014 मध्ये दिलेल्या निर्णयात  नारायण काळे याचा अपील अर्ज फेटाळून लावला आणि अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलेला पूर्वीचा आदेश कायम ठेवला. 

यामुळे सदरील  निर्णयानुसार 20 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन तहसीलदार यांनी श्रीराम देवस्थानची इनामी जमीन गावनमूना 3  वर पूर्ववत नोंद घेऊन सदरचे इनामी जमीन विक्री प्रतिबंध घेण्याबाबत मुरूम व तुगावच्या  तलाठ्याना पत्र दिले, या आदेशानुसार  मुरूमच्या  तत्कालीन तलाठ्यांने गावनमुना 3 वर इनामी जमिनीची पूर्ववत नोंद घेतली व 2016 पासून या इनामी जमिनीची दरवर्षी बोली लावून  एक साल लागण करत महसूल मिळवले जात आहे. Mपरंतु  मौजे तुगाव शिवारातील इनामी जमीन नारायण काळे याने अनधिकृतपणे पूर्णतः  विक्री केल्याने या इनामी जमिनीचा प्रश्न कायम  राहिला आहे शिवाय येथील जमिनीचा महसूल सरकारी तिजोरीत मिळत नसल्याचे चित्र आहे. 

देवस्थानच्या इनामी जमिनीच्या संदर्भात तक्रारदार व मुरूम मधील अनेक सामाजिक संघटनेने केलेल्या संघर्षानंतर या देवस्थानची  इनामी जमीन सरकारी ताब्यात आली असताना आता उमरगा उपविभागीय अधिकाऱ्याने 23/12/ 2024 रोजी नव्याने आदेश देऊन देवस्थानची इनामी जमीन रघुवीर काळे याच्या नावे विरासत म्हणून नोंद घेण्यात यावी आणि आजपर्यंत एक साल लागण करिता जमा झालेला महसूल त्यास प्रदान करण्यात यावा असा आदेश दिला आहे. 

या आदेशाच्या पत्रानुसार  उमरगाचे विद्यमान तहसीलदार यांनी दि  27 जानेवारी 25 रोजी मंडळ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहेत दरम्यान  सदरील प्रकरणाचा निवाडा होताना याचा थांगपत्ता देखील मुरूमच्या ग्रामस्थांना लागू दिला नाही. त्यामुळे  हा प्रकरण गुपचूप व परस्पररीत्या काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शिवाय सदरील आदेश रद्द करावा. सरकारच्या ताब्यात असलेली देवस्थानची जमीन खाजगी व्यक्तीच्या नावाने विरासत मंजूर करण्याचे नेमके कारण काय? असे प्रश्न समोर येत असून या आदेशामुळे श्रीराम भक्तात  संताप व्यक्त करण्यात  आहे दरम्यान आदेश रद्द करण्यात यावा यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात येत आहे

◾पूजा अर्चा व देखभालसाठी देवस्थानला इनामी जमीन बहाल

- मुरूम येथील श्रीराम देवस्थानच्या देखभालीसाठी व पूजा अर्चा,वार्षिक धार्मिक उत्सवाचा खर्च भागवता यावा यासाठी निजाम सरकारने देवस्थानच्या नावे तुगाव व मुरूम शिवारातील वरील नमूद जमीन बहाल केला होता मात्र त्यावेळच्या पुजारी नारायण काळे याने तुगाव मधील संपूर्ण इनामी जमीन  व मुरूम शिवारातील 7 हेक्टर मधील तीन एकर जमीन विकली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जमीन ताब्यात असताना देवस्थानची देखभाल केला नाही उलट देवस्थानमधील मुर्त्या चोरून देवस्थान बंद पडण्याचा प्रकार काळे याने केला आहे त्याविरुद्ध मुरूम पोलिसात गुन्हा देखील नोंद आहे देवस्थानची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे मोठया प्रमाणात पडझड झाली आहे पूजा अर्चा करायला पुजारी देखील कोणी नाहीत तहसील विभागाने देवस्थानची इनामी जमीन सरकारच्या ताब्यात ठेवावी एक साल लागण करत महसूल मिळवून देवस्थानचा देखभाल करण्यात यावी अशी मागणी आहे

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने