मुरूमच्या उर्दू शाळेचा उत्कृष्ट स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

मुरूम/प्रतिनिधी

मुरूम येथील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू शाळेत सोमवारी दिनांक ३ रोजी दहावी व चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला 

विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाचा अनुभव उत्स्फूर्तपणे घेतला. माध्यमिक शाळेच्या मुख्याधिका म्हणून हिना रहेमान जमादार ,उप मुख्याध्यापिका बीबी मसीहा सय्यद नूरसे आणि प्राथमिकशाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून तस्मिया नसीर कुरेशी या विद्यार्थिनीनी कार्यभार सांभाळला.

 यावेळी शाळेच्या शिक्षकांनी उत्कृष्ट पाठ घेतलेल्या शिक्षकांचे व उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले 

शाळेच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एम खतीब व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे एन कुरेशी यांनी विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध  स्वयंशासन दिन कार्यक्रम आयोजनाचे कौतुक केले.  

विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक जुबेर आतार ,इम्तियाज पाशा जमादार ,पमो. हनीफ बांगी, शिक्षकेतर कर्मचारी जमीर शिकलगर, जोहर पाशा शेख, विजय कांबळे, महेबूब जमादार आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी स्वयंशासन दिनाच्या अनुभवाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने