दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शाळेत प्रांगणात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवराज कांबळे, जि.प. प्रशाला येथील शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास कंटेकुरे, प्रशाला मुरूमचे मुख्याध्यापक मोहन राठोड, कन्या प्रशाला मुरुमच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे, रेणुका कुलकर्णी, सोनाली कलशेट्टी, आनंदकुमार कांबळे, अरविंद कांबळे, अंगणवाडी ताई, मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
इयत्ता १ ली व २ री वर्गातील बाल गोपाळांनी शेतातील भाजी पाला, फळे विक्री करत जणू आठवडी बाजाराचे आणि खाऊगल्ली कार्यक्रम स्वरूपच प्रतक्षात दिसत होते. पालक चुका, कोथिंबीर, कांदे ,टोमॅटो, शेवगा, घेवडा, मूळा, गाजर, लिंबू, मिरच्या इ. भाज्या विक्रीसाठी बाजारात ठेवले गेले होते.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शेतकरी व भाजीवाल्यांच्या वेश परिधान केले होते, त्यांच्या समोर विविध खाद्य पदार्थ फळे, भाजीपाला विक्री साठी ठेवलेले होते. त्यामुले यांचा खमंग सुगधं सर्वत्र दरवळत होता.एक आगळे-वेगळे आनंदी वातावरण या तयार झाले होते.
यातून मालाचा भाव ठरवणे ' खरेदी विक्री तोंडी हिशोब करणे नफा तोटा इ. बाबींचे व्यवहार ज्ञान मुलांना झाले पाहिजे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात खरी कमाई उपक्रमांतर्गत इ.३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी खाऊ गल्लीचे आयोजन केले होते.
खाऊ गल्लीच्या या स्टॉप वर भेळ' चिवडा, शाबूवडा, उडीदवडा. बटाटेवडा , पॅटीस ,पास्ता , मंच्युरियन ' मोमोज. इ. लज्जत दार आणि खमंग पदार्थ बनवले होते. ऊसाचा रस, रसना, मठ्ठा, चहा इ.पेये ही ठेवली होती.
पालकांनी व विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट पदार्थांचे आस्वाद घेतला व मुलांना प्रोत्साहन देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन राजू गायकवाड व फोटोग्राफी व डेकोरेशन अमर कांबळे यांनी केले होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी,पालक, गावकरी व शिक्षक रुपचंद ख्याडे, शिवाजी गायकवाड, सुनिता मिरगाळे, मंगल कचले यांचे मोलाचे योगदान लाभले .