
मुरूम/प्रतिनिधी.
सोलापूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी ते उमरगा तालुक्यातील तलमोड पर्यंतचा रस्ताची कामें आणि अनेक ठिकाणच्या उड्डाणपुलाचे कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत.कांही ठिकाणी झालेले काम सुद्धा उखडले गेले आहेत. त्यामुळे मार्गावर प्रवास करताना अपघाताच्या घटना दिवसा गणिक घडत आहेत. मागील 12 वर्षात निकृठ आणि अनियमितता कामामुळे या मार्गावर अपघात होवून अनेक जण प्राणास मुकले आहेत. तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या रस्त्याच्या निकृष्ट व थंडावलेल्या कारभाराबद्दल खासदार व अनेक सामाजिक कार्यकर्ते महामार्ग प्राधिकरणला तक्रारी अनेकवेळा केल्या आहेत. शिवाय आंदोलनं केले आहेत. मात्र या विभागातील अधिकारी व ठेकेदार एकमेकांचे भागीदारी बनून राहत असल्यामुळे रस्त्याचे व उड्डाणपुलाचे कामे ढिसाळपणाने चालू आहे.
याबद्दलच्या जन तक्रारी वाढल्याने त्याची दखल घेत दि. 5 फेब्रुवारी, बुधवारी उमरगा लोहारा विधानसभाचे आमदार प्रवीण स्वामी गुरुजी तसेच उबाठा गटाचे शिवसेना नेते बाबा पाटील व इतर राजकीय पदाधिकारी यांनी महामार्ग रस्ता कामाची पाहणी केले व महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी बोलावून याविषयी विचारणा करत फैलावर घेतले.व तात्काळ सदरील रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या
आमदार साहेब टोल वसुली थांबवा -
सोलापूर ते तलमोड पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग रस्ता काम अर्धवट आहे, उड्डाण पुलाचे कामे पूर्णतः झाल्या नाहीत असे वास्तव स्थिती असताना फुलवाडी आणि तलमोड जवळ टोल नाका सुरू करून टोल वसुली केली जात आहे या टोल दोन्ही टोल नाक्यावर तुळजापूर आणि उमरगा लोहारा तालुक्यातील वाहनधारकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे यासाठी आमदार प्रवीण स्वामीनी सदरील नाक्यावरील टोल वसुली बंद करावेत अशी मागणीपरिसरातील नागरिकांतून होत आहे