जिथं हॉटेलवर बस थांबली; तिथे प्रवाश्यांची लूट झाली. बस भाड्यापेक्षा नास्टा पडतोय भारी, चार आण्याची कोंबडी, बाराण्याचा मसाला, हा राजरोष पणे चालणारा गोरख धंदा प्रकार मुख्यमंत्री व परिवहनमंत्री कायदेशीर कारवाई करून थांबवावील का?


धाराशिव/सागर कोळी 

जिथं हॉटेलवर बस थांबली; तिथे अतिरिक्त दर आणि निकृष्ट पदार्थ खावे लागते. या प्रकारामुळे गोरगरीब प्रवाशांना बस भाड्यापेक्षा नास्टा खर्च भारी पडत आहे. आणि वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवास दरम्यानचा खर्च म्हणजे चार आण्याची कोंबडी, बाराण्याचा मसाला, असा होत आहे.

हा राजरोष पणे चालणारा गोरख धंदा मुख्यमंत्री व परिवहनमंत्री कायदेशीर कारवाईच्या सूचना समंधित विभागाला देवुन थांबवाव्यात ? अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

महामंडळाच्या विविध बसेस उमरगा ते हैद्राबाद, उमरगा पुणे मुंबई अशा लांब पल्याच्या मार्गांवर सरकारी बसने जाताना आणि परत येताना महाराष्ट्र महामंडळाची बस व अन्य बसेस ठराविक हॉटेल व धाब्यावर थांबवतात अश्या हॉटेल मध्ये बस चालक व वाहक यांना मोफत जेवण मिळते.

परंतु रात्र असो की दिवस बस मधील प्रवाश्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही. तासभर बस थांबत असल्याने वेळ वाया जातो.शिवाय भात, भाकरी, चपाती, इतर खाद्य पदार्थ तीप्पटिने, चौपट्टने दर आकारले जाते. बंद पॉकेट, शीतपेय छापिल किंमत कधीच घेतली जात नाही.

अश्या ठिकाणी प्रवासी तक्रारी केल्यास अरेरावी केली जाते, दमबाजी आणि धमकी देण्यात येत असते. कांही गडबड झाल्यास हॉटेल व्यवसायिक स्थानिक गुंडांना बोलावून जाब विचारणाऱ्या प्रवाश्यावर दबाव टाकतात, मारहाण करण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे ग्रामीण असो की, शहरी भागातील प्रवाशी गुमान पैसे देत असतात.

अश्यावेळी बस चालक आणि वाहक प्रवाश्यांची बाजू घेत नासल्याचे निदर्शनास येत आहे. कारण त्यांचा नेहमीचा प्रवास असल्याने ते हॉटेल मालकांची बाजू घेतात असे स्पष्ट दिसून येते.

हॉटेल समोरील ट्रिंग ऑफ्रेशन पाहण्यासाठी व्हिडीओ वर टच करा 

सदरील हॉटेल धारक एस टी महामंडळाला किरकोळ महसूल वर्षाकाठी  देत असतील पण परंतु रात्रंदिवस प्रवाश्यांची होणारी लूट पाहता हा गोरख धंदा बंद करणे आवश्यकता आहे

👉🏻 याबाबत राज्य परिवहन मंत्री व पालकमंत्री असलेल्या सरनाईक यांच्या धारशिव जिल्ह्यातील एका प्रवाश्याने भित भीत केलेल्या व्हीडिओ रेकॉर्ड वर वास्तव पाहण्या योग्य असून त्यांच्यावर कारवाई करायला पुरेसं आहे.

👉🏻 उमरगा ते हैद्राबाद याच मार्गावर बस मधील प्रवाश्यांना अश्या समस्याला तोंड द्यावा लागत असते. मुंबई ते हैद्राबाद मार्गावर व राज्यातील इतर ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. या मनमानी गैरप्रकार थांबवण्याची गरज आहे.

👉🏻

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने