पुणे दि. 25- जिजाऊ आणि शिवरायांच्या वास्तव्य आणि पदस्पर्शनी पावन पुण्यभूमीत एकेकाळी महिलांना सुरक्षित असणारे शहर आज अत्यंत असुरक्षित आणि गुन्हेगारीचे शहर झाले आहे. देश विदेशातून या शहरांमध्ये लाखो पालक त्यांच्या मुला-मुलींना शिकायवयासाठी ठेवतात आणि या मुली एकट्याने शहरात फिरतात, प्रवास करतात. आता यांची जबाबदारी कोणावर ? असा प्रश्न उपस्थित करून ग्रहमंत्रालय यंत्रणा काय झोपा काढते काय? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात असून आप च्या मुकुंद किर्दत यांनी महाराष्ट्राचे गृह मंत्री तर केवळ पक्ष आणि राजकारण यातच व्यस्त असतात त्यांना जनतेच्या हिताचे कांही पडलेलं नाही असा आरोप आणि जळजळीत संताप व्यक्त करत या घटनेचा जाहीर निषेध करून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
घटनेने संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की, इथल्या गुंडांचे धाडस एवढे वाढले आहे की हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन, आजूबाजूला प्रवासी, एसटी महामंडळाची सुरक्षा व्यवस्था हे सर्व असताना गुन्हेगारी नोंद असलेले गुंड या ठिकाणी निरधास्तपणे गंभीर गुन्हे करत असतील तर हे सर्व अपयश केवळ स्थानिक प्रशासनाचा नाही तर गृह खात्याचेच आहे.
महिला आयोगाने कुठून तरी यावर प्रतिक्रिया देतात, महिला चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या नीलम गोर्हे घटना घडून गेल्यावर भेट देऊन जातात हा नेहमीचा कार्यक्रम झाला आहे. याने कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी कमी होत नाही हे त्या जाणतात. त्यामुळे अशा भेटी आणि प्रतिक्रियांनी पुणेकरांना दिलासा मिळत नाही. त्यासाठी खरोखर प्रशासन आणि पोलिसावरती वचक असायला हवा आणि पुणे शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये हा वचक पूर्णपणे संपल्याचे दिसून येते आहे. कोंढवा येवलेवाडी घाटातील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना उदभवत असतील आणि जनतेचं रक्षण करणाऱ्या प्रशासनाच करायच काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.
मग ते कोयता प्रकरण असो, मंगळसूत्र चोरी असो, की बलात्काराच्या घटना असो किंवा रस्त्यावरचे अपघात असो या सर्वच बाबतीत आता पुणे हे गुन्हेगारीचे शहर बनू लागले आहे आणि वर्दळीच्या स्वारगेटवरती असा गुन्हा घडणं हे पुणे शहरासाठी लज्जास्पद आहे. या शिवशाही बस मधील बलात्कार म्हणजे राज्यात गुंडशाही आली असल्याची चिन्हे आहेत.
आज मी , मुकुंद किर्दत, आपच्या सुनीता काळे , सईद अली पाहणी करण्यासाठी व आमदार निलम गोर्हे यांना जाब विचारण्यासाठी स्वारगेट ला गेलो असता स्वतःची गाडी स्वारगेट स्थानकात आणून बोलणे टाळत पोलिसांसोबत निघून गेल्या