उमरगा उपविभागीय अधिकाऱ्यानेच केला स्वतःच स्थळ पाहणीचा पंचनामा

मुरूम/ राम डोंगरे 

मुरूम येथील श्रीराम देवस्थानचे मुरूम आणि तुगाव शिवारात इनामी जमीन आहे व इनामी  जमीन सरकारच्या ताब्यात आहे असे असताना उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी  देवस्थानची इनामी जमीन पुजारी नसलेल्या एका खासगी व्यक्तीच्या नावे परस्परित्या विरासत मंजुरीचा आदेश काढला आहे.त्याची प्रत आमच्या महाराष्ट्र नवक्रांती न्यूज पोर्टल च्या हाती लागल्याने सर्वप्रथम त्वरित विषय लावून बातमी 11 फेब्रुवारी रोजी प्रसारित केली आणि त्यानंतर इतर ठिकाणीही ती प्रसारित झाली.

त्यामुळे या शंकास्पद व चुकीच्या आदेशाविरुद्ध मुरूमवासियात आणि प्रिंट व सोशल मीडियात  तक्रारीचा भडिमार सुरू झाल्यानंतर या प्रकरणी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी गुरुवारी दि 27 रोजी स्वतःहून श्रीराम देवस्थान ठिकाणी हजर राहिले व स्थळ पाहणी करत सविस्तर माहिती घेत पंचनामा केला.

घटनास्थळी नेमकी सत्यतता काय आहे ते  समोर आली .त्यामुळे याप्रकरणी मंडळ अधिकारी आम्ले यांनी खोटी व चुकीचे अहवाल सादर केल्याने हा प्रकार घडला असून मंडळ अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

श्रीराम देवस्थानच्या पूजा अर्चा विधी आणि उत्सव साजरा करण्यासाठी निजामाने या देवस्थानला शेत जमीन बहाल केली आहे. यामध्ये मौजे तुगाव शिवारात 4 हेक्टर 76 आर व मौजे मुरूम शिवारात सर्व्हे नं.95 मध्ये 7 हे.40आर इतकी इनामी जमीन आहे यामधील तुगाव शिवारातील इनामी जमीन  नारायण काळे या व्यक्तीने सातबारा वर  स्वतःच्या नावे नोंद करून  अनधिकृतपणे विक्री केली आहे तर मुरूम शिवारातील इनामी जमीन सरकारच्या ताब्यात आहे उमरगा तहसीलमार्फत दरवर्षी येथील जमिनीचा एक साल लागण करून महसूल मिळवले जात आहे. विशेष म्हणजे धारशिवचे तत्कालीन अप्पर जिल्हाअधिकारी व संभाजीनगरचे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी श्रीराम देवस्थानची इनामी जमिन सरकारी निगराणीत ठेवावी तसेच एक साल लागण करण्यात यावी असा आदेश यापूर्वीच दिलेली आहेत.

त्यामुळे 2015/16 पासून इनामी जमीन सरकारी ताब्यात आहे. परंतु रघुवीर काळे या व्यक्तीने मंडळ अधिकाऱ्याला संगनमत करून खोटे अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे  सादर करून सदरील इनामी जमीन स्वतःच्या नावे इरासत म्हणून मंजुरी मिळवला आहे या कारनाम्याचा गाजावाजा  झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे व ते स्वतःच गुरुवारी श्रीराम देवस्थान गाठून  प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली  असता प्रत्यक्ष पाहणीचे सत्यता आणि मंडळ अधिकाऱ्याने दिलेला अहवाल यात तफावत असल्याचे सांगितले. मंडळ अधिकारी यांनी खोटे अहवाल दिले असून त्यांना नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले व सदरील प्रकरणाचा  अहवाल जिल्हाधिऱ्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने