पुणे : सध्या दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु आहेत व रजमान महिना सुरु होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था च्या अनुषंगाने पोलीस प्रशासन नागरिकांच्या सोईसाठी विविध उपाययोजना राबवित आहे. सायलेन्सरचा फटाका व कर्ण कर्कश आवाज करीत नागरिकांना त्रास देणार्या वाहनचालकांविरुद्ध विविध ठिकाणी नाका बंदी करून त्यावर कारवाई केली. २८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात २० वाहनांवर कारवाई करत या गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून त्यावर पुणे महापालिकेचा रोड रोलर बोलवून त्यावर फिरवला.
ही विशेष मोहिम पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.