पुणे : प्रतिनिधी :
पुणे येथे 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध कार्यक्रम संम्पन्न झाले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून कार्यकमाची सुरवात करण्यात अली. त्यानंतर माननीय राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी त्यांच्या प्रा. नेत्या अंजलीताई आंबेडकर याच्या हस्ते विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळविलेल्या अनेक व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. समता सैनिक दल युनिट ने यावेळी उत्कृष्ट मानवदंना, परेड सादर करून राष्ट्रीय ध्वज तिरंगा स सलामी देवुन प्रजासत्ता दिन साजरा करण्यात करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय सदस्य डॉ. नितीन ढेपे, पुणे शहर अध्यक्ष ॲड.अरविंद तायडे, जेष्ठ नेते वसंतदादा साळवे, महा. प्रदेश सदस्य युवा आघाडी ऋषिकेश नांगरे पाटील, महासचिव विश्वास गदादे, महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई चव्हाण, सिद्धार्थ नागदेवते, सागर आल्हाट यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#PrabuddhBharat