या युद्धात पेशवाईचा दारुण पराभव झाला. भिमा नदीच्या तिरावर झालेल्या या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ त्याच ठिकाणी विजय स्तंभ उभा केला गेला आहे. त्यामुळे त्याला मानवदंना देण्यासाठी देशातल्या विविध भागातून मोठा❤️ दलित -बौध्द जनमुदाय एकत्र जमत असतो.
या ऐतिहासिक घटनेला आज 1 जानेवारी 2025 रोजी 207 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने साईनगर कोंढवा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार व त्रिरत्न सोशल फौंडेशन च्या वतीने विहारात कार्यक्रमात घेण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी विजय स्तंभास मानवदंना देवून सलामी दिली. आणि सर्वांना जिलेबी वाटुन विजयाचा आणि नवं वर्षाच्या शुभेच्छा देवून आंनद साजरा केला.
मान्यवरांनी कोरेगावच्या इतिहासा विषयी माहिती दिली आणि या लढाईचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले.
यावेळी त्रिरत्न सोशल फौंडेशनचे अध्यक्ष अप्पा तळेकर, उपाध्यक्ष भागवत पालखे, सचिव सागर कांबळे, शिवाजी झेंडे, अनंत सरवदे दत्ता हजारे यांच्यासह अनेक महिला आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून सर्वांनी एकतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता केली.
सर्व वाचकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा