भारतीय बौद्ध महासभा पुणे समता सैनिक दल व खडकवासला विधानसभा वंचित च्या वतीने न्यू. उत्तमनगर येथे महामानवास अभिवादन


पुणे -दि. 6 डिसेंबर - भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल पश्चिम हवेली पुणे जिल्हा पुर्व व वंचित बहुजन आघाडी खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या वतीने महामानवास अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी माननीय धनंजय बिटले साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून परमपूज्य  महामानव,भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल पुणे जिल्हा पूर्व आणि पश्चिम हवेली तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.

 यावेळी भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल पुणे जिल्हा पूर्व व हवेली तालुका पश्चिम विभाग कार्यकारिणीच्या वतीने ई.व्ही.एम च्या विरोधात सही मोहीम राबवण्याण्याचा निर्णय जाहीर करून मा. मधुकर दुपारगुडे अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष विनोद निगडे, युवा अध्यक्ष राजेंद्र कांबळे ,युवा उपाध्यक्ष राहुल रिकिबे खडकवासला विधानसभा यांच्या वतीने सहीचे मोहीम  स्वाक्षरी पत्रक वाटप करण्यात आले.

यावेळी सीनियर डिव्हिजन ऑफिसर रतन कदम अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पश्चिम हवेली सिनियर डिव्हिजन ऑफिसर अमोल सोनवणे, कोशाधक्ष पश्चिम हवेली अनंत कांबळे, सरचिटणीस पश्चिम हवेलीडी के सोनवणे संस्कार उपाध्यक्ष पश्चिम हवेली रवींद्र कदम प्रचार उपाद्यक्ष पश्चिम हवेली सुप्रिया थोरात सरचिटणीस पश्चिम हवेली महिला विभाग नीता निकडे, कोश्याध्यक्ष पश्चिम हवेली महिला विभाग विजया दातार, संस्कार सचिव पश्चिम हवेली महिला विभाग धम्मा बागडे, प्रचार सचिव पश्चिम हवेली मेघराज बागडे संरक्षण सचिव पश्चिम हवेली दिनेश सोनवणे कार्यालयीन सचिव पश्चिम हवेली बळवंत जाधव संघटक पश्चिम हवेली चंद्रकांत सोनवणे समता सैनिक पश्चिम हवेली सांगोले सर आणि परिसरातील अनेक भीम आनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने