रुग्ण हक्क परिषद चे कार्यकर्ते रुग्णांचे नातेवाईक व अधिकारी,
पुणे दि. ०८ - सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे नोव्हेंबर २०२३ च्या महिन्यात एका पस्तीस वर्षीय गृहिणी महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले होते.
35 वर्षीय मुलीची किडनी निकामी झाल्याने तिच्या वृद्ध आईने स्वतःची एक किडनी दान केली होती. आणि आशेने महागडे ऑपरेशन करून घेतले. आई आणि मुलीचा रक्तगट वेगळा असला तरी डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाने आत्मविश्वासामुळे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन केले. परंतु दुर्दैवाने ऑपरेशन नंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी तिची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी दवाखान्यातच तिचे निधन झाले.
आपल्या एक किडनीमुळे आपल्या मुलीचा जिव वाचू शकेल असे समजून तिच्या वृद्ध आईने स्वतःची किडनी दिली परंतु वर्षभरातील बारा महिन्यात तब्बल अकरा वेळा त्या महिलेला आयसीयू मध्ये ऍडमिट करावे लागले.
वर्षभराच्या काळात संबंधित हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला तब्ब् ल 52 लाख रुपये तर खर्च झाले त्यानंतर पून्हा महिलेस ऍडमिट करावे लागले असताना २४ लाख बिलापैकी बारा लाख रुपये बिल भरले होते.
इतका खर्च करून ही व्हेंटिलेटर वर असताना उपचारादरम्यानच रविवारी दि. 8 दिसें 24 रोजी सकाळी ०९. ०० वाजता तिचे निधन झाले.
वर्षभरात संबंधित ३५ वर्षीय महिला अकरा वेळा आयसीयू मध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. या काळात ५२ लाख रुपये खर्च केल्यानंतर देखील त्यांची प्राणांची झुंज अपयशी ठरली.
रविवारी सकाळी ०९ वाजता त्यांचा मृत्यू झाल्या नंतर हॉस्पिटलमध्ये निर्णय घेणारे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. शिवाय पैसे स्वीकारणाऱ्या बिलिंग मधील अधिकाऱ्यांशिवाय तिथे कोणीही उपस्थित नसल्याने. सकाळी ०९ वाजल्यापासून ते दुपारी ०२ वाजेपर्यंत हॉस्पिटल मधील प्रत्येक केबिन कुलूप बंद अवस्थेत असताना. मयत रुग्णाचे भाऊ आणि पती यांनी बिल माफ करून मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडे रडून दया याचना केली, मात्र नित्य नियमानुसार बिल भरा मगच मृतदेह मिळेल,असा असंवेदनशील,भयंकर पवित्रा रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी घेत राहिले.
रविवार असल्याने सर्वांनाच सुट्टी आहे आम्ही कोणीही काही निर्णय घेऊ शकत नाही, असेच त्यांचे म्हणणे होते.
सुमारे दहा तास झाले तरी मृतदेह मिळत नाही म्हणून मयत रुग्णाचे सर्वच नातेवाईक जहांगीर हॉस्पिटलमध्येच उपोषणाला बसले. मयत रुग्णाच्या भाऊ आणि पतीने रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना लेखी अर्ज करून मदत करण्याची विनंती केली.
जहांगीर हॉस्पिटल मध्ये मृतदेह ताब्यात मिळावा म्हणून सायंकाळी ०७ वाजता सुरू झालेले उपोषण रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मध्यस्थीने मार्ग काढून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपवला.
मा.उमेश चव्हाण त्यांनी शासनाच्या विविध विभागांना लेखी अर्ज करून मदत मागुण बारा लाख रुपयांचे बिल संपूर्ण माफ केल्यानंतर आणि भविष्यातही या बिलाची मागणी कुठल्याही परिस्थितीत करणार नाही असे हॉस्पिटल कडून हमी घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला.
* "रुग्ण हक्क परिषदेच्या मध्यस्ती मुळे मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात"
* "रविवारी मृत्यू येणे म्हणजे भयंकर मनस्ताप आणि एक प्रकारची कठोर शिक्षाच झाल्यासारखे वाटते"
- पीडित नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया
* "सुट्टीच्या दिवशी आयुक्त कार्यालयाने हॉस्पिटल विभाग रविवारी सुरू ठेवायला पाहिजे. किंवा रुग्णालय प्रशासनाने निर्णय घेणारा किमान एखादा तरी अधिकारी रविवारच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नियुक्त केला पाहिजे."
- रुग्ण हक्क परिषद अध्यक्ष उमेश चव्हाण
यावेळी बोलताना रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष " उमेश चव्हाण म्हणाले की, गंभीर अवस्थेतील रुग्णाला ऍडमिट करताना किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी हॉस्पिटल मधील मोफत उपचार घेण्यासाठीचे कोणते अधिकारी उपलब्ध नसतात, ही चुकीची परंपरा मोडीत काढली पाहिजे.
अशा सुट्टीच्या दिवशी आयुक्त कार्यालयाने देखील हॉस्पिटल विभाग रविवारी सुरू ठेवायला पाहिजे.किंवा रुग्णालय प्रशासनाने निर्णय घेणारा किमान एखादा तरी अधिकारी रविवारच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नियुक्त केला पाहिजे.
यावेळी मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण हक्क परिषदेला धन्यवाद दिले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे, आशिष कांबळे आणि रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. निखिल इंगळे यांनीही रुग्णालय प्रशासनाला मृतदेह तात्काळ नातेवाईकांच्या ताब्यात द्या, यासंदर्भातील आदेश दिले होते.
मातंग समाजाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी यासाठी रुग्ण हक्क परिषदेला धन्यवाद दिले, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये यांनी दिली.