माडज -सावळसूर शिव रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी माडज ग्रामस्थांचे आमदारांना निवेदन

उमरगा दि. 29 - माडज- सावळसूर शिवरस्ता  व वहिवाटीचा  रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी माडज येथील शेतकऱ्यांनी तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांना निवेदन देवून मार्ग काढण्याची विनंती केली.
माडज सावळसूर शिव रस्त्याचा प्रश्न गेली तीन वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मार्गी लागला नाही तसेच सदरील  माडज गावातील जवळपास 150 शेतकऱ्यांचा पूर्वापार चालू असलेला वहिवाटीचा रस्ता पण धनदांडग्या शेतकऱ्याने बंद केला असून त्यावरही प्रशासन मूग गिळून गप्प बसलेले आहे.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी याबाबत न्याय मिळावा म्हणून आमदार साहेबांना निवेदन दिले.
 यावेळी आप्पाराव गायकवाड , प्रेमनाथ शहापूरे, अभय माने, अमोल मारेकर, आदिनाथ काळे, भिमाशंकर काळे , वैजनाथ काळे, शेतकरी सुधाकर माने, उद्धव माने, राजेंद्र माने, अंकुश माने , विष्णु माने , तुकाराम माने, प्रशांत माने, पंडीत माने, अविनाश शिंदे, विकास माने व इतर अनेक शेतकरी उपस्थित होते

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने