उमरगा दि. 13, प्रतिनिधी : पाणी हे निकराची बाब आहे त्यामुळे शहरात होत असलेल्या पाईपलाईनचे काम गुणवत्ता पूर्वक व्हावे यात हलगर्जीपणा झाल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा उमरगा लोहारा आमदार प्रवीण स्वामी यांनी आज पाईप लाईन उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात व्यक्त केला.
उमरगा शहरालगत आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते माकणी ते उमरगा पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष पाईप टाकून कामाचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती सुलतान शेठ होते, तर व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, शिवसेना जेष्ठ नेते बसवराज वरनाळे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, शिवसेना युवा नेते डॉ अजिंक्य पाटील, काँग्रेस कमिटीचे सचिव विजय वाघमारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या उदघाटन पर कार्यक्रमात बोलताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की केंद्र सरकारने ही पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. शहरात जवळपास दहा हजारांपेक्षा अधिक घरे आहेत त्यामुळे ही योजना गुणवत्ता पूर्ण होणे गरजेचे आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
त्यामुळे याकामासंदर्भात नागरिकाच्या तक्रारी येता कामा नये जनतेच्या मनासारखे व अंदाज पत्रका प्रमाणे काम व्हावे अन्यथा यात हलगर्जी आढळून आल्यास योग्य ते जन आंदोलन उभारण्यात येईल लोकांनीही या पाईपलांचे काम पूर्ण झाल्यानंतर नळाला मीटर बसविण्यात येणार आहे त्यामुळे आत्तापासूनच काटकसरी करणे काळाची गरज आहे.
यावेळी नानाराव भोसले, एम ओ पाटील, अजित चौधरी विजय दळगडे, विजयकुमार नागणे, अशोक सांगवे,सतीश जाधव, विजय तळभोगे, दादासाहेब गायकवाड, एडवोकेट दिलीप सगर, अभिषेक औरादे, सोहेल इनामदार, राजेंद्र समाने बलभीम आंबुलगे, जीवन सरपे, बाबा मस्के, धीरज बेळमकर नगरपरिषद उप अभियंता राजन वाघमारे, शेषराव भोसले आधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी तर सूत्रसंचालन एसपी इनामदार यांनी केले. शेवटी आभार मुख्याधिकारी जाधवर यांनी मानले