रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा - आमदार प्रवीण स्वामी



उमरगा प्रतिनिधी :  रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजले जाते त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी, जनतेच्या तक्रारी येता कामा नये अशे सांगून रुग्णालयाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा येथे दिले.               

उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सर्व सोयीयुक्त नवीन प्रसुती कक्षाचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांचे हस्ते 12 डिसेंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार स्वामी म्हणाले की या उमरगा रुग्णालयाचा नाव लौकिक मोठा आहे त्यामुळे रुग्ण आल्यानंतर त्यांची काळजीपूर्वक सेवा करावी यात कसली हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही असे सांगून,

या रुग्णालयाच्या संदर्भात मुलीचा जन्मदर चांगला आसला तरी या रुग्णालयात दोन स्त्रीरोग तज्ञ पदे रिक्त आहेत नवीन कर्मचारी निवासस्थान तसेच या रुग्णालयासाठी जागा अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे या मागण्या शासन दरबारी मांडून या समस्येचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.    

तालुका वैद्य वैद्यकीय अधिकारी डॉ कोमल जाधव, वैद्यकीय अधिकारी, डॉ विनोद जाधव, डॉ विजय जाधव,डॉ पंडित बुटकणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ संजय कांबळे, डॉ स्वाती डोंगरे, डॉ सुभद्रा गाढवे, अफसरबी तांबोळी, पंचशीला हंताळकर, मीरा घंटे,माया बंडगर, सुनीता पवार,आदी अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने