मुरूम/ प्रतिनिधी :
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतात आत्महत्या केली आहे.
त्यामुळे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी उमरगा लोहाराचे (उबाठा) आमदार प्रवीण स्वामी यांनी सोमवार 23 डिसेंबर रोजी येणेगूर येथे आत्महत्याग्रस्त बिराजदार कुटुंबाची भेट घेतली. व परिस्थिती जाणून घेवुन त्यांचे सांत्वन केले. शिवाय बँकांनी सक्तीची वसुली करू नये अशा सूचना ही त्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार शिवसेना जिल्हा शेतकरी संघटक विजयकुमार नागणे जकेकुर माजी सरपंच राजेंद्र समाने दीपक हिप्परगे मल्लिनाथ हिप्परगे पिंटू हिप्परगे विश्वनाथ स्वामी अप्पू जाधव अविनाश माळी दिलीप संघ शेट्टी विश्वनाथ स्वामी फिरोज मुन्शी अक्रम माळवाले आदी उपस्थित होते.
त्याच प्रमाणे लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील शिवशंकर स्वामी मठपती गुरुजी यांचे सुद्धा निधन झाले असल्याने त्यांच्याही कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार प्रवीण स्वामी यांनी सांत्वन केले.