उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखानास्थळी गुरुवार दि 19 रोजी येथील ग्रामीण रुग्णालय व साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले.सदर शिबिराचे उद्घाटन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरणजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ऊस तोडणी कामगार तसेच कर्मचारी, ट्रक चालक यांचे रक्त गट,एच.बी.सि.बि.सि व एच.आय.व्हीं. याबाबत तपासणी करण्यात आली.
यावेळी ग्रामीण रुग्णालय मुरूमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी सोनवणे, समुपदेशक संतोष थोरात, सुजित जाधव, प्रयोग शाळा तंत्रज्ञ विजय भोसले, उमेश लोखंडे, औषध निर्माण अधिकारी गजानन ठोंबरे, पुष्पा गोरे त्याचप्रमाणे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसणे, चीफ इंजिनियर अमोल अष्टेकर, शिवचंद मेनसे, सुरेश गायवाड,अतुल राखेलकर,लेखा विभागाचे राजेंद्र पाटील,आनंदराव मनाळे व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिरात एकुण -७७ जणांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.