आमदार चौगुले साहेबांचा झालेला पराभव हा अनपेक्षित विश्वासघातकी आणि गल्ली पुढाऱ्यांचे पाप !

आलूर / मल्लिनाथ गुरवे-  मो 8888983361,

"परिस्थिती सापेक्ष मंत्री पदाच्या चालून आलेल्या संधीला तालुका तर मुकलाच पण आमदार चौगुले यांचा अनपेक्षित झालेला पराभव आणि नवख्या प्रवीण स्वामींचा विजय हा सर्वांनाच ग्राउंड लेवल वर आणणारा ठरला आहे."

उमरगा लोहारा विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा भरवश्याचा बेट्समन यावेळी चौकार ऐवजी रणऔट मुळे आस्वाशीत लाल दिव्याचे स्वप्न भंगले  आणि तालुक्याचे कधी नं भरून येणारे नुकसान मात्र झाले. 

उमरगा लोहारा मतदारसंघात ज्ञानराज चौगुले चौथ्यावेळी चौकार मारून लाल दिव्याची गाडी आणणार होते, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही उमरगा येथे बोलावून सभा घेवुन राज्यपातळीवर आणि मतदारसंघात स्वतःची बाजू भक्कम असल्याचा दावा खरा ठरवत आपण चौथ्यानंदा सहज आमदार आणि मंत्री होवू असा आत्मविश्वास ही त्यांच्यात होता. 

असे असताना त्यांच्याच दुहेरी फळीतील लोकांनी त्यांना म्हणावी तशी साथ दिली नाही. अशा लोकांनी चौगुले साहेबांना भ्रमात ठेवले. गल्ली पुढऱ्यांवरच्या भरवशातुन ग्राउंड लेवलच्या मतदारपर्यंत त्यांना नेहले नाही.असा निकाल पत्र सांगतेय..

तालुक्यातील 1800 कोटीचे आणलेले बजेट,सरकारच्या लोकोपयोगी अनेक योजना लडकी बहीण -भाऊ एस टी प्रवास सवलत, पेन्शन, विमा शिवाय मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि शहा मोदीचा करिष्मा पाठीशी असताना त्याच प्रमाणे तालुक्यात सातत्याने राजकीय विचारातून विरोधातील गट भाजपच्या माध्यमातून मिळालेली खंभीर सोबत असताना त्यांचा झालेला पराभव हा राजकीय विश्लेषकांच्या चिंतनाचा विषय आहे.

याचा उलट फायदा नवख्या प्रवीण स्वामी यांना मिळाला आहे ईथे चूक ज्ञानराज चौगुले यांची नसून त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या वर विश्वास घेत प्रचार यंत्रणा राबवली त्याच यंत्रणेने चौगुले यांना  धोक्यात आणले आहे. विभाग वाईक जबाबदारी आणि विश्वास असताना त्या त्या ठिकाणी मिळालेली मतं आणि मताची कटोती  हे सर्व कांही सांगून जाते.

यंदा  चौकार मारणारे आमदार बॉण्डरी च्या बाहेर गेले कसे?आणि तालुक्यातील -राज्यातील परिस्थिती सापेक्ष मंत्री पद मिळण्याची संधी केवळ जवळच्या टीम मधील लोकांमुळे हुकली असं अनेकांना वाटतय.

ज्यांना  गावात गल्ली पुढारी म्हणतात व ते उमरगा येथे जाऊन मोठा पुढारी आहे असे बोलून दाखवतात अश्या लोकांना चौगुले जवळ घेत राहिले  तसेच जवळच्याच लोकांना अनेक विकास करण्यासाठी रस्ते काम व इतर गुत्ते देणे, व ते लोक अर्धवट निकृठ प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने लोक खवळत राहिले त्यांनी मंदिरासाठी निधी देऊन भक्तांना जवळीक करण्याचा प्रयत्न केले पण मंदिर की मशिद असे बांधकाम झाल्याचे लोक बोलायला लागले. तालुक्यातील शेवटच्या भागातील अनेक दलित वस्त्यां पर्यंत त्यांना पोहचूच दिले गेले नाही.असे ही कांहीनी मत मांडले.

"औशात अभिमन्यूचे चक्रविव्ह भेद,

तर लोहारा उमरग्यात चौगुले रण आऊट ठरले "

तसेच जवळपास असलेल्या औसा चे आमदार शेत रस्ता प्रश्न पाच वर्षात सोडवले त्यांनी 250 शेत रस्ता प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यशस्वी झाले पण 3 टर्म आमदार असताना 30 शेतरस्ते प्रश्न सोडवल्या नाहीत निवडणूक जवळ आल्यावर कांही युवकांना स्वतःच्या खर्चातून लाख लाख रुपये देऊन टेन्शन मिटवण्याचा प्रयत्न जरूर केले पण इतर भागातील शेतकऱ्यांत चिंता अधिक वाढत राहिली  निवडणूक दरम्यान धनशक्ती वर जनता जवळ येईल असे गृहीत धरून अमाप पैसे वाटले आणि वाटत आहेत अशी चर्चा यावेळी अधिक झाली पण लोकांपर्यंत धन गेले नाही म्हणून लोक ज्ञानी झाले गल्लीच्या पुढाऱ्यांना जवळ घेत शेवटच्या मतदारांना मात्र लांबून नमस्कार त्यांनी निवडणूक  जिंकू शकतो हा भ्रम निराशजनक ठरला गेला आहे 

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने