लोहारा उमरगा -
ज्यांना आमदार व खासदार केले ,ज्याला तीन वेळा आमदार केलं अश्या गद्दारानी शिवसेनालाच काय जनतेच्या मताशी देखील गद्दारी केली आहेत यांना आता गाडा व आपल्याकडे आता प्रवीण स्वामी हे प्रामाणिक ,शिक्षित उमेदवार सर आहेत यांना मोठया मताने विजयी करा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोहारा येथे केले.
" दरम्यान या सभेला प्रचंड गर्दी होती उपस्थितांमधून पन्नास खोके गुरू शिष्य ओके अश्या घोषणा मोठं मोठ्याने येत होत्या "
धाराशिव जिल्यातील उमरगा लोहारा राखीव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी चे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे चे उमेदवार प्रा. प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ लोहारा येथे आयोजित सभेत शिवसेना पक्ष प्रमुख पुढे म्हणाले की महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर महिलांना लक्ष्मीयोजनाअंतर्गत 3 हजार मदत देण्यात येईल , शेतकऱ्यांना हमीभाव देणार, कर्ज माफ करणार, पाच जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवणार. मुलांना शिक्षण मोफत देणार,महिलांना प्रति महिना 3 हजार देणार, सुरक्षा देणार, 25 लाख पर्यंत मेडिकल सेवा देणार.असे सांगत प्रवीण स्वामी यांना विजयी करावे असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, सोयाबीनचा प्रश्न, कापसाचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे अशा समस्या असताना 370 कलमचा महाराष्ट्रला काय उपयोग. मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात जनतेच्या सहकार्याने व धीराने काम केल्यामुळे महाराष्ट्र वाचला.मोदींना मते मागताना आज सुद्धा बाळासाहेब चे नाव घ्यावे लागते ही खरी ताकत आहे शिवसेनाची. शिंदेना माझं आवाहन आहे कि, माझ्या वडिलांचे नाव न घेता स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मागून दाखव.मग तुमची लायकी समजेल. असे सांगून
मोदींचे विमान सोलापूरला उतरणार होते म्हणून माझे हेलिकॉप्टर उडू दिले नाही अशी लोकशाहीची थट्टा सुरु आहे. सगळी यंत्रणा गुलाम बनविली आहे. महाराष्ट्रला मोदी शहा यांचा गुलाम ही मंडळी बनवीत आहेत असा आरोप करून लोकसभेला आम्ही जसा यांना दणका दिला. तसा यावेळी विधानसभा ला सुद्धा यांना दणका द्यायचे आहे. तसा विश्वास व्यक्त करून माझ्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रवीण स्वामी ला प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
यावेळी शिंदे शिवसेना गटाचे बाजार समिती माजी सभापती सुलतान सेठ यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये ठाकरे शिवसेनात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशा मुळे आमदार चौगुले यांना धक्का मानला जात आहे.
धाराशिव चे खासदार ओम राजे म्हणाले कि, यावेळी प्रामाणिक पणे विद्यार्थीना शिकविणारा शिक्षक, ज्याच्या कडे इमानदारी आहे, नीतिमत्ता आहे, सज्जन आहे अशा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रवीण स्वामी यांना महाविकास आघाडी ने उमेदवारी दिली आहे. स्वामी यांना प्रचंड मतांनी निवडून दयावे असे आवाहन केले.
मी मरेपर्यंत शिवसेना चा पाईक राहीन. मला या निवडणुकीत विजयी करून आपली सेवा करण्याची संधी दयावी असे आवाहन शिवसेना उमेदवार प्रवीण स्वामी यांनी केले.