पुणे - संत सावता क्रांती परिषद म्हणजे समाजसुधारकांच्या शिकवणीचा वारसा पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा आणि शपथ असून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत सावता महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि हिंदु बहुजन समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया ! असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या प्रेरणेतून आणि क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या समाजसुधारक चळवळींच्या आदर्शातून प्रेरित होऊन, हिंदु बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नव्या क्रांतीची दिशा घडवली जात आहे !
संत सावता क्रांती परिषद ही फक्त एक संस्था , नाही, तर या समाजसुधारकांच्या शिकवणीचा वारसा पुढे घेऊन जाण्याची प्रतिज्ञा आहे. या परिषदेचा उद्देश बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणे, आपला देव ,देश ,धर्म ,समता व न्यायाचे मूल्य समाजात रुजवणे, आणि शिक्षण, रोजगार व स्वावलंबनाच्या माध्यमातून समाजाला सक्षम बनवणे हा आहे.
श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांनी समाजात कर्माचे महत्त्व सांगत परमार्थ साधला , तर महात्मा फुले यांनी समाजात सत्याचा आधार घेत समतेची स्थापना केली आणि क्रांतिज्योती सावित्रीमाईनी शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला. या तिन्ही थोर व्यक्तींनी दाखवलेल्या मार्गावर चालत आम्ही समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी एकत्र येत आहोत.
आमदार श्री. योगेश (अण्णा) पुंडलिक टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या ऐतिहासिक परिषदेच्या माध्यमातून हिंदु बहुजन समाजाला एकसंध, सशक्त, आणि प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा संकल्प करण्यात येत आहे. कर्म, समता, आणि शिक्षण या मूल्यांच्या अधिष्ठानावर उभारलेली ही क्रांती, समाजात एक नवी चेतना निर्माण करेल.
जय सावता - जय ज्योती - जय क्रांती!
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत सावता महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि हिंदु बहुजन समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!