स्वराज्य निर्मितीत शूरवीर जिवाजी महाले यांचे भरीव योगदान- रामदास सूर्यवंशी

पुणे - स्वामी निष्ठेचा आणि पराक्रमाचा इतिहास हा नेहमी प्रेरणादायी असाच असतो. शूरवीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडावरील योगदान हे मोलाचे असून, इतिहासातील "होता जिवाजी म्हणून वाचले छ.शिवाजी ' या म्हणीतून त्यांचे स्वराज्यातील योगदान समजून येते. त्यांचे मूल्य अनमोल अन प्रेरणादायी असे आहे. असे प्रतिपादन बारा बलुतेदार संघांचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी केले. 
बारा बलुतेदार संघाच्या, सकल नाभिक समाज व शूरवीर जिवाजी महाले स्मारक समितीचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या आणि मा.नगरसेविका सौ.पल्लवीताई चंद्रशेखर जावळे यांच्या प्रयत्नातून आणि पुणे मनपाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या अपोलो टॉकीज, रास्ता पेठ, पुणे येथील स्मारक या ठिकाणी सालाबाद प्रमाणेच शूरवीर जिवाजी महाले जयंती सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी वीर जिवाजी महाले यांच्या पुतळ्यास पुष्पहार रामदास सूर्यवंशी, हेमंत श्रीखंडे, हनुमंत यादव, विनायक गायकवाड,किशोर पवार, गणेश साळुंके, प्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. श्रीफळ, गुलाल बाळासाहेब भामरे व महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते वाढवण्यात आला.
 यावेळी या सोहळ्याच्या 2025-2026 च्या उत्सव प्रमुख पदी हेमंतराव श्रीखंडे यांची निवड समितीचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी जाहीर केली. 
या कार्यक्रमास विकास चरेकर, अमोल थोरात, विनायक रणदिवे, गणेश चातुर, बाळकृष्ण निढाळकर, गणेश साळुंके, अमोल दळवी, संतोष साळुंके, परशुराम काशीद,विनायक साळुंके,वसंत पवार,किशोर पवार,नागेश कोकाटे, अमोल कस्तुरे, हिमांशू महाले, जयसिंग कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बारा बलुतेदार संघांचे व स्मारक समितीचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी होते. यावेळी विनायक गायकवाड, हेमंत श्रीखंडे, विकास चरेकर, बाळकृष्ण निढाळकर यांनी त्यांच्या कार्य वाटचालीवर विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारा बलुतेदार संघांचे प्रदेश सचिव राजेंद्र पंडित तर प्रास्ताविक परशुराम काशीद तर आभार अमोल थोरात यांनी मानले.


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने