नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती मुरमु यांच्या हस्ते दि.8 ऑक्टोबर रोजी (2022चा) ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मिथुन चक्रवर्ती यांनी ‘सुरक्षा’, ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.
‘मृगया’ (1976) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता.
‘डिस्को डान्सर’ (1982) या चित्रपटाने त्यांना अखंड भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली.
त्यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिल्ली येथील विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले.
या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते. प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2022 चे आहेत.