उमरगा : यावर्षी उमरगा तालुक्यातील मुरूम येथील बेनितुरा मध्यम प्रकल्प (तलाव) 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना आनंदाची बाब आहे हे लक्षात घेत मेघराजांची कृपादृष्टीं सदैव आपल्या तालुक्यात अशीच राहावी यासाठी शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत उमरगा - लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. ज्ञानराजजी चौगुले साहेबांच्या हस्ते विधिवत जलपुजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मामा सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथजी पाटील, भीमराव आण्णा वरणाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सांचलक तथा शिवसेना शहर प्रमुख सुरेश मंगरूळे, उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंदे, प्रशांत मुदकण्णा, सर्कल विभाग प्रमुख राजेंद्र कारभारी, शाहूराज शिंदे, शंकर आप्पा टेकाळे, शिवाजी मामा सावंत, भीमराव दाजी फुगटे, अमृत वरणाळे, रविकिरण अंबूसे, रफिक पटेल व त्यांचे सहकारी, बाळासाहेब खंडागळे, शेतकरी पाटील, सिंद्राम वाडीकर, रणजित शिंदे व इतर बांधव युवासेना शहर प्रमुख प्रल्हाद (भगत) माळी, रवींद्र जाधव, रविराज फुगटे, सतीश चौधरी, व्यंकट चौधरी, देवानंद फुगटे, रजनीकांत वाघ, मल्लीनाथ धुमुरे ,प्रसाद मुदकण्णा, साहेबलाल कुरेशी, प्रशांत सत्रे, संदीप बाबळसुरे, सागर विभुते, संतोष जाधव, प्रशांत गुरव, केसरजवळग्याचे सरपंच अमोल पटवारी, पारवे साहेब, कुंभार साहेब, खडाळकर साहेब, मुरूमचे तलाठी खरात साहेब, रामभाऊ पुजारी, शेतकरी बांधव, शिवसैनिक युवासैनिक व पत्रकार बांधव या मंगलमय प्रसंगी उपस्थित होते