पुणे - खडकी कॅन्टोन्मेंट भागात खड्डेमय रस्ते झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहेत. खड्डे दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या सयांची मोहीम राबवून आम आदमी पार्टीने प्रशासनाला निवेदन देवून खड्डे न दुरुस्त केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील होळकर ब्रिज चौक, मुळा रोड, भैय्यावाडी चौक ते खडकी बाजार रोड या गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. कॅन्टोन्मेंटच्या ढीम्म प्रशासनाला जाग आणण्यासाठी दि.4 शुक्रवार रोजी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी सोशल मीडियावर खड्डे व वाहतूक कोंडीचे फोटो उपलोड केले आणि वाहन चालकांच्या सह्यांची मोहीम राबवली.
खडकी कॅन्टोन्मेंटच्या गेले अनेक वर्ष निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला कोणी प्रतिनिधी वाली नाही असेच वाटते. कारण प्रशासनकडे अधिकार असून प्रशासन कार्यवाही करत नाही. मुख्य म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इमारती जवळच्या चौकातच खड्डे आहेत. रोज वाहतूक कोंडी होत आहे. खडकी प्रशासनाचे अधिकारी रोज येजा करतात, स्थानिक आमदार यांचे चौकातही बॅनरबाजी पोस्टर झळकत आहेत. पण त्यांना जनतेच्या समस्याकडे लक्ष घालणे महत्वाचे वाटत नाही.असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला.
या संदर्भात तातडीने खड्डे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आले असून यावेळेस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांचे सोबत पदाधिकारी मनोज एरांडकर ,अजय पारचा, विकास चव्हाण, अमोल मोरे, संजय कटारनवरे, तहसीन शेख आदी उपस्थित होते.