पुणे : कोंढव्यातील साईनगर येथील सम्राट अशोक बुध्द विहारात वर्षावास कार्यक्रम राबवला जात आहे. त्यानुसार दररोज सायंकाळी 07: 00 ते 9:30 या वेळेत नियमित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे क्रमशः वाचन होत आहे.
( फोटो भंते नागघोष )
त्यानिमित्ताने आयोजित वर्षावास कार्यक्रमात भंते नागघोष यांनी उपासक उपासकांना धम्म देशना देताना नशापान नं करण्याचा आणि जिवनात धम्मानुसार शिल पालन करण्याचे महत्व सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वाणीने बौद्ध धर्मात वर्षावासाचे महत्व, मानवी जीवनात निर्माण होणारे दुःख. दुःखाचे कारण, त्याचे निरसन, नशापान विरोध आणि शिलाला असलेले महत्व अशा विविध बुद्ध धम्म तत्वज्ञान यावर मार्गदर्शन केले.नशापान करण्याला बुद्ध धम्मात स्थान नाही तसे करणे अशोभनीय बाब असल्याचे सांगून बाबासाहेबांनी त्यांच्या जिवनात शिलाला महत्व दिल्याने ते आज जगात भारी आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत. असे भंते नागघोष यांनी यावेळी प्रबोधनात सांगितले.
सम्राट अशोक विहारात त्रिरत्न सोशल फौंडेशन व बुद्ध विहार यांच्या वतीने दररोज सायंकाळी बुद्ध, धम्म, संघ वदंना नियमित सुरु आहे. रोज सायंकाळी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रन्थ वाचनातील आशय यावर चर्चारुपी प्रबोधन असा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमासाठी विहारात उपासक प्रा.शेंडे परिवार यांनी भंते नागघोष यांची धम्म देशना कार्यक्रम घडवून आणला
यावेळी त्रिरत्न शोसल फौंडेशन चे अध्यक्ष आप्पा तळेकर सेक्रेटरी सागर कांबळे यासह पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थिती होते.